"सहारा'प्रकरणी सुनावणी पुढील आठवड्यात

यूएनआय
शनिवार, 7 जानेवारी 2017

विविध योजनांच्या माध्यमातून "सहारा'ने जमा केलेले 20 हजार कोटी रुपये 15 टक्के व्याजासह गुंतवणूकदारांना परत करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने 2012मध्ये दिला होता. मात्र, न्यायालयाच्या आदेशाची पूर्तता करण्यात "सहारा'ला अपयश आले असल्याचा आरोप "सेबी'ने न्यायालयात केला होता.

नवी दिल्ली - सहारा समूह आणि त्याचे सर्वेसर्वा सुब्रतो राय यांच्याविरोधात सुरू असलेल्या खटल्याची सुनावणी पुढील आठवड्यात घेण्यात येणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने आज स्पष्ट केले.

"सहारा'चे वकील कपिल सिब्बल यांनी याप्रकरणी न्यायालयात याचिका दाखल केली होती. याचिकेची दखल घेत याप्रकरणी पुढील आठवड्यात सुनावणी घेण्यात येईल, असे न्यायालयाने सांगितले असल्याची माहिती सिब्बल यांनी दिल्ली.

विविध योजनांच्या माध्यमातून "सहारा'ने जमा केलेले 20 हजार कोटी रुपये 15 टक्के व्याजासह गुंतवणूकदारांना परत करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने 2012मध्ये दिला होता. मात्र, न्यायालयाच्या आदेशाची पूर्तता करण्यात "सहारा'ला अपयश आले असल्याचा आरोप "सेबी'ने न्यायालयात केला होता.

Web Title: sc to take up sahara case in next week