
आज फ्रेंडशिप डे जगभरात साजरा केला जात आहे. यानिमित्त मित्रांच्या कटुगोड आठवणी शेअर करत सेलिब्रेशन केलं गेलं. मित्रांचे फोटो अनेकांनी शेअर केले. काहींनी मित्रांसोबतच्या आठवणींना उजाळा दिला. आता सोशल मीडियावर फ्रेंडशिप डेनिमित्त एक स्टोरी व्हायरल होत आहे. तरुणीनं लहानपणी शाळेत ज्याच्याशी भांडण झालं, ज्याला रडवलं आणि जो कधीच शाळेत बोलला नाही त्याच्याशीच लग्न झाल्याचं सांगितलंय. तिने काही फोटोही शेअर केलेत.