शिक्षिकेला 'हॉट' म्हणाला म्हणून धमकावलं; 8वीच्या विद्यार्थ्याने घेतला गळफास | School Student Suicide | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

suicide

शिक्षिकेला 'हॉट' म्हणाला म्हणून धमकावलं; 8वीच्या विद्यार्थ्याने घेतला गळफास

नवी दिल्ली : उत्तर पूर्व दिल्लीतील करावल भागात एका शाळकरी विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केली आहे. सदर विद्यार्थी इयत्ता आठवीत शिकत होता. आपल्या शाळेतील शिक्षिकेला 'हॉट' बोलला म्हणून त्या शिक्षिकेने त्याला आणि त्याच्या पालकांना शाळेतून काढून टाकण्याची धमकी दिली होती. त्यानंतर विद्यार्थ्याने घरी येऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

(School Student Suicide)

हेही वाचा: गॅस टँकरचा अपघात होऊन गॅसगळती; 2 हजार 300 कोंबड्या दगावल्या

अभिषेक असं आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचं नाव असून तो आठवीत शिकत होता. तो शाळेत असताना त्याच्या शिक्षिकेला 'हॉट' असं बोलला होता. त्यानंतर शिक्षिकेने त्याच्या पालकांना आणि त्याला शाळेत बोलावून शाळेतून काढून टाकण्याची धमकी दिली होती. त्यानंतर दुसऱ्या कोणत्याच शाळेत तुला प्रवेश मिळणार नाही असंही सांगितलं होतं. त्यानंतर त्याने शाळेतून घरी येऊन आपल्या बेडरूममध्ये गळफास लावून आत्महत्या केली आहे. या घटनेनंतर मुलाच्या पालकाने शिक्षिकेवर आरोप केले आहेत. शिक्षिकेने दिलेल्या धमकीमुळे अभिषेकने आत्महत्या केल्याचं त्याच्या पालकांनी सांगितलं आहे.

हेही वाचा: भारत पुढच्या 5 वर्षात सागरी उत्पादनाच्या निर्यातीत करणार दुप्पट वाढ

अभिषेकचे वडील अशोक कुमार यांनी सांगितलं की, "३ जून रोजी त्याच्या शाळेतून फोन आला आणि तुमच्या मुलाच्या गैरवर्तनाबाबत शाळेत भेटायला यावे लागेल असं सांगितलं होतं. त्यानंतर अभिषेक आणि त्याचा भाऊ शाळेत गेले. तिथे गेल्यावर त्यांच्याकडून शिक्षिकेने माफीनामा लिहून घेतला आणि अभिषेकला शाळेतून काढून टाकण्याची धमकी दिली होती. याच्या नंतर तुला कोणत्याच शाळेत प्रवेश मिळणार नाही अशी धमकी दिली. त्यानंतर ते दोघे घरी आले आणि अभिषेकने जेवन केले. त्यानंतर त्याने आपल्या खोलीत जाऊन गळफास घेतला." असं आत्महत्या केलेल्या अभिषेकचे वडील म्हणाले. यानंतर त्यांच्या पालकांनी त्याच्या शिक्षिकेवर आरोप केले आहेत.

दरम्यान त्याच्यावर आधी मोबाईल चोरीचा आरोप लावला होता आणि नंतर त्याच्यावर अपशब्द वापरत 'हॉट' म्हणल्याचा आरोप लावला होता. असं त्याच्या शाळेतील सहकाऱ्यांनी सांगितलं आहे.

Web Title: School Student Suicide Hot Teacher Bullying

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :crimeteachersstudent
go to top