esakal | Coronavirus : कौतुकास्पद ! ज्या शाळेत क्वारंटाईन केले त्या शाळेची केली रंगरंगोटी
sakal

बोलून बातमी शोधा

school where the workers quarantined shone said we are hardworking people cannot sit and eat give some work

कष्ट करुन कमावणाऱ्या कामगारांनी एक कौतुकास्पद काम केल्याची घटना राजस्थानमधील सिकर जिल्ह्यात घडली आहे. एका शाळेत हरयाणा आणि उत्तरप्रदेशमधील मजूर लोकांना क्वारंटाईन करण्यात आले होते. या शाळेत त्यांची तेथिल गावकऱ्यांनी अत्यंत चांगली सोय केली आहे. हे पाहून त्यांनी राहात आहेत त्या संपूर्ण शाळेचे रंगरंगोटीचे काम करुन दिले आहे.

Coronavirus : कौतुकास्पद ! ज्या शाळेत क्वारंटाईन केले त्या शाळेची केली रंगरंगोटी

sakal_logo
By
वृत्तसंस्था

सीकर (राजस्थान) : हातावर पोट असणाऱ्या कामगारांनी एक कौतुकास्पद काम केल्याची घटना राजस्थानमधील सिकर जिल्ह्यात घडली आहे. एका शाळेत हरयाणा आणि उत्तरप्रदेशमधील मजूर लोकांना क्वारंटाईन करण्यात आले होते. या शाळेत त्यांची तेथिल गावकऱ्यांनी अत्यंत चांगली सोय केली आहे. हे पाहून त्यांनी राहात आहेत त्या संपूर्ण शाळेचे रंगरंगोटीचे काम करुन दिले आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राहत असलेल्या शाळला रंगरंगोटीची गरज आहे हे त्या मजुरांच्या लक्षात आलं. त्यानंतर त्यांनी शाळा व्यवस्थापनाला आवश्यक ते सामान आणून देण्याची विनंती केली. सामान मिळाल्यानंतर त्या सर्व कामगारांनी सर्व शाळेचे काम व्यवस्थित करुन दिले. काम पूर्ण होत आल्यानंतर गावकऱ्यांनी आणि शाळा व्यवस्थापनाने कामगारांना त्यांच्या कामाचे पैसे देऊ केले मात्र त्यांनी ते नाकारले. गावकऱ्यांनी आणि शाळेने त्यांना अन्नपाणी निवारा देऊ केलाय त्याची ही परतफेड करण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचे कामगारांकडून सांगण्यात आले आहे.

गावकऱ्यांनी केली व्यवस्था
गावचे सरपंच रूपसिंह यांनी सांगितले की, कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी गावातील शाळेला अलगीकरण कक्ष बनवण्यात आले आहे. ज्यामध्ये १८ एप्रिल रोजी हरयाणा, उत्तरप्रदेश आणि बिहारला चाललेल्या ५४ कामगारांना तेथे थांबविण्यात आले आहे. गावकऱ्यांनी पैसे गोळा करुन जमेल ती मदत करत या कामगारांच्या खाण्यापिण्याची सोय केली आहे. काही दिवसानंतर मात्र, कामगारांनी गावकऱ्यांना सांगितले की आम्ही कष्ट करणारी माणसं आहोत, काम न करता रिकाम्या हाताने बसू शकत नाहीत. तुम्ही जसे आमच्या अन्न-पाण्याची सोय केली आहे, त्याप्रमाणेच आम्हाला तुमच्यासाठी काहीतरी करण्याची इच्छा आहे. शाळेची साफसफाई करण्याची तुम्ही आम्हाला परवानगी द्यावी. यावर सरपंचानी परवानगी दिली.

Coronavirus : कोरोनावरुन केंद्र आणि प. बंगाल सरकारमध्ये पुन्हा जुंपली

परवानगी मिळाल्यानंतर कामगारांनी आम्हाला रंग आणून द्या आम्ही शाळेची रंगरंगोटीही करुन देतो असे सांगितल्यावर त्यांना रंग आणून दिला आणि त्यांनी शाळेची रंगरंगोटी करुन दिली.  यावेळी रंगरंगोटी करण्यासाठी गावातील युवा ग्रामस्थांनीही या कामगारांना मदत केली.