Science Day : नेहरूंची योजना यशस्वी झाली असती तर आईनस्टाईन भारताचे नागरिक झाले असते?

भारताचे महान शास्त्रज्ञ सी व्ही रमण यांचा आज जन्मदिन
Science Day
Science Dayesakal

Science Day : भारताचे महान शास्त्रज्ञ सी व्ही रमण यांचा आज जन्मदिन. रमण हे भारतातील त्या महान शास्त्रज्ञांपैकी एक होते ज्यांना रमण प्रभावासाठी भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले होते. भारत स्वतंत्र झाल्यानंतर तत्कालीन पंतप्रधान नेहरूंनी डॉ. सी.व्ही. रमण यांच्या वैज्ञानिक क्षमतेचा पुरेपूर फायदा घेण्याची व्यवस्था केली.

Science Day
Chat Gpt : एमबीए, मेडिकलच नाही.. ChatGPT या 8 परीक्षांमध्ये पास झालाय, गुगलला देखील बसला धक्का

नेहरू रामन आणि शास्त्रज्ञ डॉत्यांना किती आदर असायचा हे नेहरूंनी रमण यांच्या नियुक्तीसाठी लिहिलेल्या पत्रावरून समजू शकते. नेहरूंच्या जीवनावर आधारित नेहरू मिथ अँड ट्रूथ या पुस्तकात या संपूर्ण प्रकरणाचा उल्लेख करण्यात आला आहे.

Science Day
Viral Video : चक्क Chat GPT ने एअरलाइन्सलाच खडसावलं! व्हिडीओ होतोय व्हायरल

नेहरू केवळ विज्ञानाच्या बाबतीत देशाची प्रगती व्हावी याकडे लक्ष देत नव्हते. मोठमोठ्या शास्त्रज्ञांना पूर्ण सन्मान मिळेल याची काळजीही ते घेत होते. शांती स्वरूप भटनागर आणि सी.व्ही.रामन यांच्यासारख्या महान शास्त्रज्ञांच्या प्रतिष्ठेनुसार नेहरूंनी पदे निर्माण केली. सम्राट अकबराने आपल्या नवरत्नांना जेवढा आदर दिला असावा, त्याच आदराने पंतप्रधान नेहरू यांनी आपल्या कार्यकाळात संशोधकांना वागणूक दिली. 11 जानेवारी 1949 रोजी नेहरूंनी त्यांच्या प्रधान खाजगी सचिवांना लिहिलेल्या एका चिठ्ठीमध्ये याचा प्रत्यय येतो.

Science Day
Health Blog: अर्धकपोतासन;फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते

'नेहरूंच्या आग्रहामुळे डॉ. सीव्ही रमण यांच्यासाठी १९४८ मध्ये भौतिकशास्त्राचे राष्ट्रीय प्राध्यापक हे पद तयार करण्यात आले. हे स्पष्टपणे केवळ त्यांच्यासाठीच बनवले गेले कारण डॉ. रमण हे विज्ञान जगतातील एक मोठे व्यक्तिमत्त्व आहेत. विज्ञानाच्या क्षेत्रात त्यांच्या सेवेचा जास्तीत जास्त उपयोग व्हावा यासाठी तत्कालीन सरकार उत्सुक होते आणि त्यांनी त्यांच्या इच्छेनुसार संशोधन कार्य करावे अशी पंतप्रधानांची इच्छा होती.

Science Day
Technology Tips : Ola-Ather ला घाम फुटला, हिरो घेऊन येणार इलेक्ट्रिक स्कूटरची नवी रेंज

सीव्ही रमण यांच्यासारख्या प्रतिष्ठित शास्त्रज्ञाला त्यांच्या कार्याच्या प्रमाणात असा सन्मान मिळायला हवा यासाठी सरकारकडून प्रयत्न करण्यात आले. त्यांच्यासाठी बनवण्यात आलेले हे पद दोन वर्षांसाठी अडीच हजार रुपये प्रति महिना पगारावर तयार करण्यात आले होते आणि ते भारतीय विज्ञान अकादमीशी जोडले गेले होते. सीव्ही रामन यांनी 1948 मध्ये बंगळुरूमध्ये रमन संशोधन संस्था स्थापन केली. नेहरू आणि सीव्ही रमण यांची विज्ञानाबाबतची जुगलबंदी फार जुनी होती.

Science Day
Mumbai-Pune Travel : मुंबई-पुणे प्रवासाचं प्लॅनिंग असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! वाहतूक मार्गात होणार 'हे' बदल

1938 मध्ये सुभाषचंद्र बोस काँग्रेसचे अध्यक्ष असतानाही हिटलरच्या जुलमी कारभारामुळे जर्मनीतून पळून गेलेल्या ज्यू शास्त्रज्ञांना कसेतरी भारतात आणण्याची योजना नेहरू आणि रामन यांनी आखली होती असं सांगितलं जातं. त्यावेळी जर्मनीच्या ज्यू समुदायात सर्वात मोठे वैज्ञानिक होते आणि अल्बर्ट आइनस्टाइन हे देखील त्यापैकी एक होते. पण काही कारणाने ही योजना अस्तित्वात आली नाही आणि त्यावर काम करता आले नाही.

Science Day
Onion Paratha Recipe : वाढत्या उन्हापासून वाचायचं आहे? ट्राय करा आजीच्या बटव्यातला हा पदार्थ!

पुढे ज्यू लोकांसाठी वेगळा इस्रायल देश बनवण्याला नेहरूंचा विरोध होता. याबद्दल आईनस्टाईन ने लिहिलेल्या पत्राला देखील त्यांनी उत्तर दिले नाही. या विषयावर त्यांच्यात मतभेद होते मात्र जवाहरलाल नेहरू आणि आइनस्टाईन यांच्यातील मैत्री अखेर पर्यंत कायम राहिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com