Nikki Bhati Burnt Alive by Husband’s FamilyEsakal
देश
स्कॉर्पिओ, बुलेट दिली, पैशांची मागणी वाढतच राहिली; पत्नीला जिवंत जाळलं, आरोपींवर कठोर कारवाईची मागणी
Nikki Bhati Dowry Case लग्नात हुंडा म्हणून स्कॉर्पिओ, बुलेट दिली. तरीही पतीसह सासरच्या मंडळींकडून मागण्या सुरूच होत्या. शेवटी तिला जिवंत जाळण्यात आलं आणि तिचा मृत्यू झाला.
ग्रेटर नोएडात हुंड्यासाठी पत्नीची हत्या केल्याच्या घटनेनं खळबळ उडालीय. लग्नात हुंडा म्हणून स्कॉर्पिओ, बुलेट दिली. तरीही पतीसह सासरच्या मंडळींकडून मागण्या सुरूच होत्या. त्यासाठी विवाहितेचा छळ केला जात होता. शेवटी तिला जिवंत जाळण्यात आलं. यात गंभीररित्या भाजलेल्या महिलेचा रुग्णालयात नेत असताना वाटेतच मृत्यू झाला. निक्की असं विवाहितेचं नाव आहे. या प्रकरणी तिच्या पतीसह, सासू-सासरे आणि दीरावर आरोप करण्यात आलेत. त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावी अशी मागणी होतेय.