"हे राम' म्हटल्याबद्दलच्या विधानाचा विपर्यास 

पीटीआय
बुधवार, 31 जानेवारी 2018

गांधीजींच्या वैयक्तिक सचिवांचा दावा 

चेन्नई - महात्मा गांधीजी गोळी लागल्यावर "हे राम' म्हटले नाही, असे मी कधीही म्हटले नव्हते, असा दावा गांधीजींचे तत्कालीन वैयक्तिक सचिव वेंकिता कल्याणम यांनी आज केला. 

गांधीजींच्या वैयक्तिक सचिवांचा दावा 

चेन्नई - महात्मा गांधीजी गोळी लागल्यावर "हे राम' म्हटले नाही, असे मी कधीही म्हटले नव्हते, असा दावा गांधीजींचे तत्कालीन वैयक्तिक सचिव वेंकिता कल्याणम यांनी आज केला. 

वेंकिता कल्याणम (वय 96) हे 1943 ते 1948 या काळात गांधीजींचे वैयक्तिक सचिव होते. 2006 मध्ये एका पत्रकार परिषदेमध्ये कल्याणम यांनी केलेल्या विधानामुळे खळबळ उडाली होती. "नथुराम गोडसेने गोळी मारल्यावर गांधीजी "हे राम' असे म्हटले नव्हते,' असे कल्याणम म्हणाले होते. महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी कल्याणम यांचे हे विधान चुकीचे असल्याचे तेव्हाच म्हटले होते. आज मात्र आपल्या विधानाबाबत बोलताना कल्याणम म्हणाले की, माझ्या विधानाचा विपर्यास केला गेला आहे. गोळी लागल्यानंतर गांधीजी "हे राम' म्हटल्याचे मी ऐकले नाही, असे मी म्हणालो होतो. गांधीजींना गोळी लागल्यानंतर निर्माण झालेल्या गोंधळात मला काही ऐकू आले नाही. कदाचित ते "हे राम' म्हटले असतील. गोडसेने गांधीजींना एकदाच मारले, मात्र त्यांच्या शिकवणीचा अवलंब न करून राजकीय पक्ष त्यांना रोज मारत आहेत, अशी टीकाही कल्याणम यांनी आज केली. 
 

Web Title: Scroll Staff Share Tweet Email Reddit Print Share Tweet Email Reddit Print GANDHI'S MURDER I never said that Mahatma Gandhi did not utter ‘Hey Ram’ when Nathuram Godse shot him, says aide