लडाखमध्ये भारतीय लष्कर व चिनी सैन्यात चकमक...

वृत्तसंस्था
बुधवार, 16 ऑगस्ट 2017

या तलावाचा दोन तृतीयांश भाग चीनच्या नियंत्रणामध्ये आहे. या तलावाच्या भागात घुसखोरी करण्याचा चिनी सैन्याचा प्रयत्न भारतीय लष्कराने उधळून लावल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे

नवी दिल्ली - भारत-चीन सीमारेषेवरील पूर्व लडाख भागामध्ये भारतीय लष्कर व चिनी सैन्यामध्ये चकमक झाल्याचे संवेदनशील वृत्त आज (बुधवार) सूत्रांनी दिले.

पूर्व लडाखमधील पॅंगॉंग तलावाच्या उत्तरेस आज सकाळी दोन्ही देशांच्या लष्करी तुकड्यांमध्ये संघर्ष घडल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. या तलावाचा दोन तृतीयांश भाग चीनच्या नियंत्रणामध्ये आहे. या तलावाच्या भागात घुसखोरी करण्याचा चिनी सैन्याचा प्रयत्न भारतीय लष्कराने उधळून लावल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

चिनी सैन्यास हाकलून देताना दोन्ही तुकड्यांदरम्यान दगडफेकही झाल्याचे दिसून आले आहे. या दगडफेकीमध्ये दोन्ही देशांचे जवान जखमी झाले. अखेर चिनी सैन्याने घटनास्थळावरुन माघार घेतली.या प्रकरणी भारतीय लष्कराकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

चीनकडूनही अशी कोणतीही घटना घडल्याचे वृत्त फेटाळून लावण्यात आले आहे.

Web Title: Scuffle between Indian and Chinese troops in Ladakh