सागरी हवामानाचा अंदाज मोबाईलवर

वृत्तसंस्था
गुरुवार, 20 डिसेंबर 2018

रत्नागिरी : समुद्रात बसविलेल्या "वेव्ह रायडर बोया' या यंत्राद्वारे संभाव्य मासेमारी क्षेत्राची माहिती मच्छीमारांना मिळणार आहे. सागरी हवामानाची पूर्वकल्पना मच्छीमारांना मोबाईल संदेशाद्वारे मिळणार आहे. त्याचा उपयोग मच्छीमारांना सुरक्षितता आणि साधनसामग्री वाचविण्यासाठी करता येईल, असे प्रतिपादन हैदराबाद येथील "इन्कॉईस'चे शास्त्रज्ञ यतीन ग्रोवर यांनी केले. 

जी. एस. वेदक विज्ञान महाविद्यालय, भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्र (विज्ञान मंत्रालय), भारत सरकार तसेच सम्यक विश्‍व संघ यांच्या वतीने "सागरी हवामान अंदाज आणि संभाव्य मासेमारी क्षेत्र' या विषयावर कार्यशाळा आयोजित केली होती. समुद्रात बसवलेल्या वेव्ह रायडर बोयाच्या जवळपास 50 मीटरच्या अंतरावर मासेमारी करू नये. जेणेकरून मासेमारी करताना जाळी अडकू शकते, म्हणून ही काळजी घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या.

या वेळी शास्त्रीय माहिती अंकाचे प्रकाशन करण्यात आले. अमेरिकेतील कॅपिलॉन विद्यापीठाचे माजी कुलपती डॉ. लिऑन रिचर्ड, तटरक्षक दलाचे कमांडिंग ऑफिसर आशिष सिंग, जिल्हा मच्छीमार संघाचे अध्यक्ष बाबामियॉं मुकादम आदी उपस्थित होते. 

दोन दिवस आधी अंदाज... 

सागरी हवामान अंदाज हा वेव्ह रायडर बोया यंत्रणेमुळे मच्छीमारांना व किनारी लोकांना दोन दिवस आधी मिळेल. हे यंत्र रत्नागिरीच्या समुद्रात बसविण्यात आले असून, त्याचा उपयोग सर्वांना होईल, असा विश्‍वास यतीन ग्रोव्हर यांनी व्यक्‍त केला.

Web Title: The Sea Climate estimate on mobile