चाच्यांच्या संशयित जहाजाचा समुद्रात शोध सुरू; भारतीय नौदलाची मोहीम

चाच्यांच्या तावडीतून सुटलेल्या व्यापारी जहाजावरील प्रॉपल्शन सिस्टिम, ऊर्जा पुरवठा आणि स्टिअरिंग गिअरच्या दुरुस्तीचे काम सध्या सुरू आहे. काही तांत्रिक दुरुस्त्या झाल्यानंतर या जहाजाचा पुढील प्रवास सुरू होईल.
Sea search for suspected pirate ship underway- Campaign of Indian Navy-
Sea search for suspected pirate ship underway- Campaign of Indian Navy-

नवी दिल्ली: उत्तर अरबी समुद्रातून ‘एम.व्ही.लिला नॉरफोल्क’ या व्यापारी जहाजाच्या अपहरणाचा कट उधळून लावणाऱ्या भारतीय नौदलाने आता चाच्यांच्या संशयास्पद जहाजाचा शोध सुरू केला आहे. या व्यापारी जहाजावर २१ जण उपस्थित होते त्यातही पंधरा भारतीयांचा समावेश होता, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. चाच्यांच्या तावडीतून सुटलेल्या व्यापारी जहाजावरील प्रॉपल्शन सिस्टिम, ऊर्जा पुरवठा आणि स्टिअरिंग गिअरच्या दुरुस्तीचे काम सध्या सुरू आहे. काही तांत्रिक दुरुस्त्या झाल्यानंतर या जहाजाचा पुढील प्रवास सुरू होईल.


या व्यापारी जहाजाला संरक्षण देण्याचे काम भारतीय युद्धनौका करणार आहेत. अपहृत व्यापारी जहाजाच्या सुटकेसाठी नौदलाने युद्धनौका, सागरी टेहळणी विमान ‘पी-८आय’, हेलिकॉप्टरसह आणि ‘एमक्यू९बी’ हे प्रिडेटेर ड्रोन तैनात केले होते. या व्यापारी जहाजाने काही अज्ञात शस्त्रधारी माणसांनी घुसखोरी केल्याचा संदेश ब्रिटनच्या ‘मेरिटाईम ट्रेड ऑपरेशन्स पोर्टल’ला पाठविला होता. या संदेशामुळेच संबंधित व्यापारी जहाजाचे अपहरण झाल्याची बाब उघड झाली होती. (Indian Navy)

आयएनएस चेन्नईचा पुढाकार-

या व्यापारी जहाजाच्या सुटकेमध्ये भारतीय नौदलाच्या कमांडोंनी महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. त्यांच्यामुळे या जहाजावरील २१ कर्मचाऱ्यांची सुटका होऊ शकली. या शोध मोहिमेमध्ये ‘आयएनएस चेन्नई’ ही युद्धनौका सहभागी झाली होती. या अपहरण नाट्याबाबत भारतीय नौदलाने एक व्हिडिओ प्रसिद्ध केला असून त्यात सुटका झालेल्या कर्मचाऱ्यांच्या प्रतिक्रिया दाखविण्यात आल्या आहेत.

Sea search for suspected pirate ship underway- Campaign of Indian Navy-
Prakash Amdekar: नवनीत राणा 6 महिन्यात जेलमध्ये दिसतील; प्रकाश आंबेडकर यांचा दावा

अंधारात काढला पळ-

भारतीय नौदलाच्या कमांडोंनी या जहाजावर प्रवेश केल्यानंतर त्यांना तिथे एकही घुसखोर आढळून आला नव्हता. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन या चाच्यांनी पळ काढला असावा, अशी शक्यता व्यक्त होत आहे. ज्या जहाजावरून हे चाचे व्यापारी जहाजावर घुसले त्या संशयित जहाजाचा युद्धपातळीवर शोध घेतला जात आहे. (Latest Marathi News)

Sea search for suspected pirate ship underway- Campaign of Indian Navy-
Aditya-L1: "भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा"; 'आदित्य L1' इच्छितस्थळी पोहोचताच PM मोदींचं ट्विट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com