कर्नाटक : नगर स्थानिक संस्थांमध्ये काँग्रेसचा वरचष्मा

कर्नाटक : नगर स्थानिक संस्थांमध्ये काँग्रेसचा वरचष्मा

बंगळूर : लोकसभा निवडणुकीत भाजपला साथ दिलेल्या मतदारांनी नगर स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसचा हात धरल्याचे स्पष्ट झाले आहे. सर्वाधिक जागा व सर्वाधिक स्थानिक संस्थांवर कॉंग्रेसचे वर्चस्व स्पष्ट झाले आहे. भाजप दुसऱ्या व धजद तिसऱ्या क्रमांकावर आहे.

लोकसभा निवडणुक निकालाचा नगर स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीवर कोणताच प्रभाव दिसून आला नाही. या निकालामुळे लोकसभा निवडणुकीत पाराभुत झालेल्या कॉंग्रेसचे नैतिक बळ वाढले आहे. अनेक स्थानिक संस्थातून त्रिशंकू स्थिती निर्माण झालेली असली तरी बहूतेक ठिकाणी कॉंग्रेस – धजद युती सत्तेवर येण्याची शक्यता आहे.

30 नगरपरिषदांच्या निवडणुकीत कॉंग्रेसला सर्वाधिक 12, भाजपला 6 व धजदला 2 ठिकाणी स्पष्ट बहूमत मिळाले आहे. 10 नगर परिषदांमध्ये त्रिशंकू स्थिती आहे. 19 पैकी 8 नगरपंचायतीत भाजपला स्पष्ट बहूमत मिळाले आहे. कॉंग्रेसला तीन नगर पंचायतीतून बहूमत मिळाले असून 8 ठिकाणी कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहूमत मिळालेले नाही. धजदला एकाही नगरपंचायतीत स्पष्ट बहूमत मिळालेले नाही. 

सात नगरपालिकांच्या निवडणुक निकालात कॉंग्रेसला दोन ठिकाणी स्पष्ट बहूमत मिळाले आहे. भाजप व धजदला एकाही नगरपालिकेत बहूमत मिळालेले नाही. पाच नगरपालिकांमध्ये त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे.

नगरपरिषदांच्या 248 प्रभागापैकी भाजप 56,  कॉंग्रेस 90, धजद 38, बीएसपी 2, अपक्ष 25 आणि इतर 6 जण विजयी झाले आहेत. नगरपरिषदेच्या एकूण 783 प्रभागापैकी भाजपने 184 जागा जिंकल्या आहेत,  काँग्रेस 322, धजद 102, बसपा 1, सीपीआय 2, अपक्ष उमेदवार 102  प्रभागात विजयी झाले आहेत. नगर पंचायतीतील 132 प्रभागापैकी भाजप 126, कॉंग्रेस 97,  धजद 34 आणि अपक्षांनी 40 प्रभागात विजय मिळविला आहे.  

बसवकल्याण आणि शाहपूर नगरपालिकेत कॉंग्रेसने वर्चस्व मिळविले आहे. हरिहर, हिरियुर, शिलाघाट,  तिपटूर आणि नंजंनगोडू नगरपालिकेत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत नाही.  नंजनगोडू नगरपालिकेत 31 पैकी सर्वाधिक 15 जागा भाजपला मिळाल्या आहेत. तीन अपक्ष नगरसेवकांच्या पाठिंब्यावर त्याना अधिकार संपादन करता येईल. 

कोप्पा, श्रींगेरी, मुडगारे, सुलीया, कलागतागी, होनवार, सिद्दापुरा आणि औरंगाबाद या नगर पंचायतींमध्ये भाजपने बहुमत मिळविले आहे. नरसिंहराजपुरा, मुलकी, यालंडूर, कमलपूर नगर पंचायतीत काँग्रेसचे बहूमत आहे.

मलिकमू, होल्केरे, तुरोवाकरे, अलुरु आणि अर्कालगुडू या नगरपरिषदेत कोणत्याही पक्षाने बहुमत मिळवले नाही. अनिकल, बंगारपेटी, बागापल्ली, पावगड, कुणीगल, के.आर. नगर, बन्नूर, श्रीरंगपट्टन, बसवनबागेवाडी, बाल्की, ह्युमाबाद, चितगुप्पा, सांडुर, हुविनाहल्ली आणि हरपनहळ्ळी या नगरपंचायतींमध्ये कॉंग्रेसने  बहूमत मिळविले आहे.

मुडबिद्री, गुंडलपेटे, मुंडरगी, बदागी नगरपंचायत भाजपचे बहूमत. धजदने बॅनर आणि श्रीरंगपट्टनमध्ये तर्चस्व मुळविले आहे. श्रीनिवासपूर, मालुर, कदूर, मालवल्ली, के.आर. पेठ, थालिककोटे, इंडी, शिगगा, भटकळ नगर पंचायतीत त्रिशंकू स्थिती आहे.

त्रिशंकू स्थिती असलेल्या स्थानिक स्वराज संस्थात कॉंग्रेस व धजद एकत्र आल्यास युती अधिकारावर येण्याची शक्यता आहे.

संस्था         एकूण संस्था    काँग्रेस    भाजप    धजद     त्रिशंकू
नगरपालिका        07         02        00      00      05
नगरपरिषदा        30          12        06      02      10
नगर पंचायती       19          03        08      00      08

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com