esakal | मे महिन्यात भारतात 121 वर्षातील दुसरा सर्वाधिक पाऊस! वाचा IMD चा रिपोर्ट
sakal

बोलून बातमी शोधा

rain

मे महिन्यात 121 वर्षात दुसरा सर्वाधिक पाऊस- आयएमडी

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

भारतीय हवामानशास्त्र विभागाने (India Meteorological Department) आपल्या मासिक अहवालात म्हटले आहे की, यावर्षी मे 2021 मध्ये 121 वर्षातील दुसरा सर्वाधिक पाऊस झाला. याचे कारण सलग दोन चक्रीवादळ आणि वेस्टर्न डिस्टर्बन्स म्हणजेच भारतीय उपखंडातील उत्तर भागात आलेले वादळ होय. आणखी काय माहिती आहे या रिपोर्टमध्ये..वाचा सविस्तर (second-highest-rainfall-in-121-years-IMD-report)

source - IMD (MAY 2021 REPORT)

source - IMD (MAY 2021 REPORT)

1917 मध्ये मे मधील सर्वात कमी तापमान

आयएमडीने असेही म्हटले आहे की यावेळी भारतात मे महिन्यातील सरासरी कमाल तापमान 34.18 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले होते. यापूर्वी 1917 मध्ये मे मधील सर्वात कमी तापमान 32.68 डिग्री सेल्सियस नोंदविले गेले. मे 2021 मध्ये संपूर्ण देशात 107.9 मिमी पाऊस पडला असून तो सरासरीपेक्षा 62 मिमीपेक्षा जास्त आहे. यापूर्वी 1990 मध्ये सर्वाधिक पाऊस (110.7 मिमी) झाला होता.

source - IMD (MAY 2021 REPORT)

source - IMD (MAY 2021 REPORT)

उष्णतेची लाट यंदा नव्हती

आयएमडीने आपल्या अहवाल असे सांगितले की, 1917 मध्ये मे मधील सर्वात कमी तापमान 32.68 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले होते. तसेच मे मध्ये भारताच्या कोणत्याही भागात उष्णतेची लाट यंदा नसल्याचे अहवालात सांगितले.

source - IMD (MAY 2021 REPORT)

source - IMD (MAY 2021 REPORT)

चक्रीवादळाचा परिणाम

मे महिन्यात अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात चक्रीवादळे आली. तसेच अरबी समुद्रात तौक्ते चक्रीवादळही आले आणि बंगालच्या उपसागरात 'यास' चक्रीवादळ आले. आयएमडीने म्हटले आहे की उन्हाळ्याच्या 2021 च्या तीन महिन्यांत उत्तर भारतवरील वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या वादळाची गती सामान्यपेक्षा अधिक होती.

source - IMD (MAY 2021 REPORT)

source - IMD (MAY 2021 REPORT)

हेही वाचा: अनोखा लग्नसोहळा! वऱ्हाडी म्हणून दिलं पशू-पक्ष्यांना आमंत्रण

हेही वाचा: 'लोकसंख्येचा स्फोट, अप्रवासी मुस्लिमांनी कुटुंब नियोजन करावं'