esakal | 'लोकसंख्येचा स्फोट, अप्रवासी मुस्लिमांनी कुटुंब नियोजन करावं'
sakal

बोलून बातमी शोधा

'लोकसंख्येचा स्फोट, अप्रवासी मुस्लिमांनी कुटुंब नियोजन करावं'

'लोकसंख्येचा स्फोट, अप्रवासी मुस्लिमांनी कुटुंब नियोजन करावं'

sakal_logo
By
सूरज यादव

गुवाहाटी - आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा यांनी राज्यातील अप्रवासी मुस्लिमांना कुटुंबांनी कुटुंब नियोजनाचा सल्ला दिला आहे. जमिनीवरचं वाढतं अतिक्रमण थांबवायचं असेल तर अप्रवासी मुस्लिमांनी कुटुंब नियोजनाचं पालन केल्यास शक्य होईल असं म्हटलं आहे. राज्यातील प्रसिद्ध तिर्थक्षेत्राचा उल्लेख करताना हिंमत बिस्वा शर्मा यांनी म्हटलं की, लोकसंख्येचा स्फोट असाच सुरु राहिला तर एक दिवस कामाख्या मंदिराची जमीनसुद्धा ताब्यात घ्यावी लागेल. एवढंच काय तर माझ्या घरावरही अतिक्रमण होईल. हिमंत बिस्वा शर्मा यांच्या मुख्यमंत्रीपदाचा एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे.

गुवाहाटीतील एखा कार्यक्रमात त्यांनी अतिक्रमण विरोधातील कारवायांबाबत प्रश्नावर उत्तर देताना हे वक्तव्य केलं. आसाममध्ये ज्याठिकाणी लोकांनी स्थलांतर केलं आहे तिथं अतिक्रमण हटवण्याची मोहिम सुरु आहे. अशा ठिकाणी अप्रवासी मुस्लिमांचे प्रमाण जास्त आहे. आसामच्या काही भागात बंगाली भाषिक मुस्लिम बांगालादेशमधून आलेले आहेत असं म्हणतात. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने असं म्हटलं होतं की, आसाममधील मूळ लोकांनी यांच्यापासून सावध राहण्याची गरज आहे.

हेही वाचा: अनोखा लग्नसोहळा! वऱ्हाडी म्हणून दिलं पशू-पक्ष्यांना आमंत्रण

आसामच्या 3.12 कोटी लोकसंख्येमध्ये अप्रवासी मुस्लिमांचे प्रमाण जवळपास 31 टक्के इतकं आहे. 126 विधानसभेच्या जागांपैकी 35 जागांचा निकाल लागण्यामध्ये यांची भूमिका महत्त्वाची ठरते. मुख्यमंत्री म्हणाले की, गेल्या विधानसभेच्या अधिवेशनात लोकसंख्या निती लागू करण्यात आली आहे. आम्ही अल्पसंख्यांक मुस्लिम समुदायासोबत मिळून काम करू इच्छितो.

लोकसंख्येचा स्फोट यामुळे गरीबी, अतिक्रमण यांसारख्या सामाजिक प्रश्न निर्माण होत आहेत. जंगल, मंदिर आणि मठांशी संबंधित वनांच्या जमिनीवर अतिक्रमणाची परवानगी दिली जाऊ शकत नाही. मात्र मला वाटतं की यामागे वाढती लोकसंख्या हे कारण आहे.

हेही वाचा: 11 वर्षांपासून होती बेपत्ता; प्रियकरासोबत लपून राहत होती शेजारीच

लोकसंख्या नियंत्रणात ठेवता आल्यास अनेक सामाजिक प्रश्न सोडवता येतील. जर अप्रवासी मुस्लिमांनी कुटुंब नियोजनाच्या नियमांचे पालन केलं तर हे शक्य होईल. त्यासाठी माझं त्यांना आवाहन आहे असंही मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा म्हणाले.