esakal | अनोखा लग्नसोहळा! वऱ्हाडी म्हणून दिलं पशू-पक्ष्यांना आमंत्रण
sakal

बोलून बातमी शोधा

अनोखा लग्नसोहळा! वऱ्हाडी म्हणून दिलं पशू-पक्ष्यांना आमंत्रण

अनोखा लग्नसोहळा! वऱ्हाडी म्हणून दिलं पशू-पक्ष्यांना आमंत्रण

sakal_logo
By
शर्वरी जोशी

गेल्या दीड वर्षांपासून आपण कोरोना विषाणूसोबत (Coronavirus) लढा देत आहोत. या विषाणूचा संसर्ग टाळावा यासाठी अनेक ठिकाणी लॉकडाउन घोषित करण्यात आला आहे. सोबतच सार्वजनिक ठिकाणी वावरतांनादेखील काही नियम व अटी लागू केल्या आहेत. यामध्येच लग्नसोहळ्यांसाठीही पाहुण्यांची मर्यादित संख्या निश्चित करण्यात आली आहे. म्हणूनच, आता अनेक लग्नसोहळे साध्या पद्धतीने, मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत करण्यात येत आहे. त्यातच सध्या सोशल मीडियावर अशाच एका लग्नाची चर्चा रंगली आहे. या लग्नात पाहुण्यांऐवजी चक्क पशूपक्ष्यांना लग्नाचं आमंत्रण देण्यात आलं आहे. प्रसिद्ध उद्योजक हर्ष गोयंका यांनी या लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. (viral-video-animals-and-birds-were-taken-care-of-in-unique-wedding-harsh-goenka-shared-the-video)

सध्या सोशल मीडियावर चर्चा होत असलेला लग्नसोहळा नेल्लोरमध्ये (Nellore) संपन्न झाला आहे. या लग्नसोहळ्याला माणसांऐवजी चक्क पशु-पक्ष्यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. त्यामुळे हा अनोखा लग्नसोहळा (Unique Wedding) चर्चेत आला आहे.

हेही वाचा: जगभर थैमान घातलेल्या कोरोनाचं वजन किती माहित आहे का?

हेही वाचा: सावधान! टॉयलेटमध्ये मोबाईल वापरणं ठरू शकतं धोक्याचं

सध्याच्या परिस्थितीत मर्यादित पाहुण्यांना आमंत्रण देण्यात येत असल्यामुळे या नववधू व वराने चक्क मुक्या प्राण्यांना मेजवानी दिली. त्यांनी या सगळ्या प्राण्यांच्या जेवणाची सोय केली होती. त्यामुळे या लग्नात मोठ्या प्रमाणावर गाय, म्हैस, माकड, पक्षी पाहायला मिळाले. विशेष म्हणजे त्यांनी प्राण्यांना जेवणासाठी फळे, ब्रेड आणि चारा यासारखी व्यवस्था केली होती.

"नेल्लोरमध्ये गोशाळेत लग्नाचं आयोजन करण्यात आलं होतं. यात फक्त प्राण्यांसाठीच खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यात आली होती. मुक्या प्राण्यांचा आशिर्वाद मिळवण्यासाठी किती चांगला मार्ग आहे हा", असं कॅप्शन गोयंका यांनी दिलं आहे.

दरम्यान, हा लग्नसोहळा निखील आणि रक्षा नामक जोडप्याचा होता. आतापर्यंत त्यांच्या व्हिडीओला ४० पेक्षा जास्त व्ह्युज मिळाले आहेत. तर, ५८७ जणांनी तो रिट्विट केला आहे.