झारखंडमध्ये दुसऱ्या टप्प्यात मतदान; 20 जागांवर लढाई

वृत्तसंस्था
शनिवार, 7 डिसेंबर 2019

झारखंड विधानसभा निवडणुकीत पहिल्या टप्प्यातील मतदान 30 नोव्हेंबरला पार पडले होते. त्यानंतर आज दुसरा टप्प्यातील मतदान होत आहे. सत्ताधारी भाजपला याठिकाणी सत्ता कायम ठेवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. आज दुसऱ्या टप्प्यात होत असलेल्या मतदारसंघांमध्ये आदिवासीबहुल भाग जास्त आहे.

रांची : झारखंड विधानसभा निवडणुकीत दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला आज (शनिवार) सकाळपासून सुरवात झाली. दुसऱ्या टप्प्यात 20 मतदारसंघांसाठी मतदान होत आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

झारखंड विधानसभा निवडणुकीत पहिल्या टप्प्यातील मतदान 30 नोव्हेंबरला पार पडले होते. त्यानंतर आज दुसरा टप्प्यातील मतदान होत आहे. सत्ताधारी भाजपला याठिकाणी सत्ता कायम ठेवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. आज दुसऱ्या टप्प्यात होत असलेल्या मतदारसंघांमध्ये आदिवासीबहुल भाग जास्त आहे. मुख्यमंत्री रघुवर दास, विधानसभा अध्यक्ष दिनेश उराव, भाजप अध्यक्ष लक्ष्मण गिलुआ यांचे भवितव्य मतयंत्रात बंद होणार आहे. 

बलात्काऱ्यांचा जागेवर ‘फैसला’

उमेदवारांची माहिती 
एकूण जागा : 81 
दुसऱ्या टप्प्यांत या जागांवर होणार मतदान : 20 
एकूण उमेदवार : 260 

वयोगट 
25 ते 30 वर्षे...37 
31 ते 40 वर्षे...67 
41 ते 50 वर्षे...91 
51 ते 60 वर्षे...40 
61 ते 70 वर्षे...21 
71 ते 80 वर्षे...1 
माहिती नाही ...3 

शैक्षणिक पात्रता 
निरक्षर..1 
साक्षर..1 
पाचवी उत्तीर्ण...1 
आठवी उत्तीर्ण..25 
दहावी उत्तीर्ण...37 
बारावी उत्तीर्ण...62 
पदवीधर...76 
व्यावसायिक पदवीधर...19 
पदव्युत्तर...32 
डॉक्‍टरेट...6 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Second phase of polling begins in 20 Jharkhand seats

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: