
कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ, दिल्लीजवळील शहरात कर्फ्यू
नवी दिल्ली : देशात कोरोनाचे रुग्ण (Corona) वाढत आहेत. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा निर्बंध वाढत आहेत. दिल्लीला लागून असलेल्या उत्तर प्रदेशातील नोएडाच्या (Noida) गौतम बुद्ध नगरमध्ये कोरोनाची प्रकरणे सातत्याने वाढत आहेत. प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली असून ३१ मेपर्यंत कलम १४४ लागू करण्यात आले आहे.
हेही वाचा: PM मोदींना कोरोना काळातील कामासाठी नोबेल शांतता पुरस्कार द्या : BSE प्रमुख
गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची रुग्णासंख्या वाढ आहे. त्यामुळे कोरोनाची चौथी लाट येणार का? अशी भीती व्यक्त केली जात आहे. राजधानी दिल्लीत देखील कोरोनाची रुग्णसंख्या वाढतेय. त्यामुळे पुन्हा मास्कची सक्ती करण्यात आली आहे. आता दिल्लीजवळच्या शहरामध्ये देखील कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे निर्बंध वाढविण्यात आले आहेत. उच्च अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय कोणालाही आंदोलने किंवा उपोषण करण्याची परवानगी दिली जाणार आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी पूजा आणि प्रार्थनेलाही बंदी घालण्यात आली आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी गर्दी जमू नये यासाठी कलम १४४ लागू करण्यात आले आहे. हे आदेश येत्या ३१ मेपर्यंत कायम असणार आहेत, असे गौतम बुद्ध नगर पोलिस आयुक्तालयाने म्हटले आहे.
सध्या भारतात १९०९२ कोरोनाचे सक्रीय रुग्ण आहेत. सक्रीय रुग्णसंख्या देशातील एकूण कोरोना रुग्णांच्या ०.०४ टक्के आहेत. आता कोरोना पुन्हा डोकं वर काढत असल्यानं शाळांबाबत देखील विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. शाळांमध्ये परीक्षेदरम्यान कोविड-19 मार्गदर्शक तत्त्वानुसार सोशल डिस्टन्सिंगचे योग्य पालन करावे लागेल.
Web Title: Section 144 Imposed In Noida Due To Corona Cases Increased
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..