esakal | आउट ऑफ टर्न प्रमोशन; दबंग कामगिरीनं कॉन्स्टेबल महिला बनली थेट इंस्पेक्टर
sakal

बोलून बातमी शोधा

seema dhaka

हेड काँस्टेबल सीमा ढाका यांनी ज्या 76 मुलांना शोधून काढलं आहे त्यातील 56 मुले 14 वर्षांपेक्षाही लहान आहेत. 

आउट ऑफ टर्न प्रमोशन; दबंग कामगिरीनं कॉन्स्टेबल महिला बनली थेट इंस्पेक्टर

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

दिल्ली : कोरोना व्हायरसच्या संक्रमणाच्या दरम्यान तीन महिन्याच्या आत हरवलेल्या 76 मुलांना शोधून काढणाऱ्या दिल्ली पोलिसमधील हेड कॉन्स्टेबल सीमा ढाका यांना आता बढती देण्यात आली आहे. त्यांना आता असिस्टंट सब इन्स्पेक्टर बनवलं गेलं आहे. त्यांना आऊट ऑफ टर्न प्रमोशन दिलं गेलं आहे. ढाका यांनी जितक्याही मुलांना शोधून त्यांच्या परिवाराशी पुन्हा भेट घालून दिलीय त्यांमधील 56 मुले 14 वर्षांहून कमी वयाची आहेत. 


तब्बल 76 मुलांना शोधलं
दिल्ली पोलिसमधील हेड काँस्टेबल सीमा ढाका यांच्या कामाची देशभरात सध्या चर्चा होत होती. त्यांनी आपल्या शौर्याने जवळपास तीन महिन्याच्या दरम्यान 76 मुलांना शोधून काढण्यात यश प्राप्त केलं आहे. या त्यांच्या यशामुळे सीमा ढाका यांना आऊट ऑफ टर्न प्रमोशन मिळालं आहे. दिल्ली पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हेड काँस्टेबल सीमा ढाका यांनी ज्या 76 मुलांना शोधून काढलं आहे त्यातील 56 मुले 14 वर्षांपेक्षाही लहान आहेत. 

हेही वाचा - दिल्लीतील प्रदुषणामुळे सोनिया गांधी गोव्यात;श्वसनाच्या त्रासामुळे डॉक्टरांचा सल्ला​
सीमा यांनी केली अतुलनिय कामगिरी

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या निवदेनानुसार, पोलिस कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी 5 ऑगस्टपासून एक खास योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेत कोणाताही कॉन्स्टेबल किंवा हेड कॉन्स्टेबल 50 किंवा त्यापेक्षा अधिक 14 वर्षांच्या हरवलेल्या मुलांचा शोध घेईल त्याला बढती दिली जाते. ( 15 मुलांचे वय आठ पेक्षा कमी असायला हवे). एक वर्षांच्या आत ही कामगिरी फत्त करणाऱ्या कर्मचाऱ्याला 'आउट ऑफ टर्न प्रमोशन' दिले जाते. सीमा ढाका या मूळच्या बढौत येथे राहणाऱ्या आहेत. सीमा यांचं लग्न अनिक ढाका यांच्यासोबत झालंय जे स्वत: पोलिस आहेत. त्यांचे वडिल शेतकरी आहेत तर भाऊ खासगी क्षेत्रात काम करतो. आऊट ऑफ टर्न प्रमोशन मिळणारी सीमा ढाका यांच्या या यशामुळे आनंद व्यक्त केला जातोय. त्यांच्या या प्रमोशनची घोषणा दिल्ली पोलिस कमिश्नर एनएन श्रीवास्तव यांनी केली आहे. याअंतर्गत इन्सेंटीव्ह स्कीम अंतर्गत प्रमोशनही दिलं गेलं आहे. या स्कीमअंतर्गत आऊट ऑफ टर्न प्रमोशन होणाऱ्या दिल्ली पोलिसमधल्या पहिल्या कर्मचारी आहेत. 

हेही वाचा - भारत वॅक्सिनच्या उंबरठ्यावर; PM मोदींकडून पूर्व तयारीचा आढावा

5 ऑगस्टपासून सुरु केली मोहिम
सीमा ढाका यांनी 5 ऑगस्टपासून आतापर्यंत एकूण 76 हरवलेल्या मुलांना शोधून काढलं आहे. या मुलांना दिल्ली आणि इतर राज्यातून शोधण्यात आलं आहे. सीमा यांच्या सांगण्यानुसार, त्यांनी या मुलांना बिहार, बंगाल तसेच देशातील इतर राज्यातून शोधलं आहे. दिल्ली पोलिसांच्या सांगण्यानुसार, आतापर्यंत 3507 मुलांच्या हरवण्याची तक्रार नोंद झाली आहे. यातील 2629 मुलांना ट्रेस केलं गेलं आहे. 2019 मध्ये 5412 मुलांच्या हरवण्याची तक्रार नोंद झाली होती. यातील आतापर्यंत 3336 मुलांना शोधण्यात आलं आहे. 

loading image
go to top