

नोएडा (उत्तरप्रदेश)ः ‘‘आधी मी पाकिस्तानची मुलगी होते, आता मात्र भारताची सून आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना माझी विनंती आहे की त्यांनी मला भारतामध्येच राहण्याची परवानगी द्यावी.’’ हे उद्गार आहेत सीमा हैदरचे. भारतातील आपल्या प्रियकरासाठी धर्म आणि देश दोन्हींचा त्याग करणारी सीमा पहलगाममधील हल्ल्यानंतर व्यथित झाली आहे. या हल्ल्यानंतर आपले जीवन पूर्णपणे बदलल्याचा दावा तिने केला. भारत सरकारने पाकिस्तानसोबतचे सर्व द्विपक्षीय संबंध तोडून टाकत येथे वास्तव्यास असणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना त्यांच्या मायदेशी परत पाठवायला सुरूवात केली आहे. आता आपल्यावरही मायदेशी परतण्याची वेळ तर येणार नाही ना या विचाराने सीमा चिंतेत आहे.