बिहारमध्ये 150 किलो अफू, 3 टन डोडा चुरा हस्तगत; एकाला अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

liquid opium

बिहारमध्ये 150 किलो अफू, 3 टन डोडा चुरा हस्तगत; एकाला अटक

पटना : बिहारमधील गया येथे बाराचती पीएस हद्दीत अफू शेती करण्यात येत असलेल्या एकाला पोलिसांनी अटक केली आहे. त्याचबरोबर यावेळी अफू, गांजा, ब्राऊन शुगर आणि डोडा चुरा मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आल्याचं सीमा सुरक्षा बलांच्या जवानांनी सांगितलं.

दरम्यान झारखंड सीमेजवळ सुरक्षा बलांच्या जवानांना एका गावात अफूच्या लागवडीची माहिती मिळाली होती. त्यानंतर त्यांनी सदर ठिकाणी छापा टाकून मुद्देमाल जप्त करत एकाला अटक केली आहे. यामध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणावर अफू, गांजा आणि डोडा चुरा ताब्यात घेतला आहे. दरम्यान 150 किलो अफू, 3000 किलोपेक्षा जास्त डोडा चुरा आणि गांजा, ब्राऊन शुगर जप्त करण्यात आले आहे.

"आम्हाला झारखंड सीमेजवळील एका गावात अफूच्या लागवडीची माहिती मिळाली. आम्ही पोलिसांसह गावात छापा टाकून सुमारे 150 किलो अफू, 3000 किलोपेक्षा जास्त डोडा चुरा आणि गांजा, ब्राऊन शुगर जप्त केली. यावेळी एका व्यक्तीला अटक अटक करण्यात आली असल्याचं सीमा सुरक्षा बलाचे कमांडंट एच के गुप्ता यांनी सांगितलं.

टॅग्स :Biharcrime