esakal | नीरव मोदीला दणका; ईडीकडून तब्बल इतक्या कोटी मालमत्तेवर टाच
sakal

बोलून बातमी शोधा

Seizure of Nirav Modi's property from Directorate of Recovery

पंजाब बँक गैरव्यवहार प्रकरणातील फरार हिरे व्यापारी नीरव मोदी याच्या ३२९.६६ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणल्याचे सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आज सांगितले.

नीरव मोदीला दणका; ईडीकडून तब्बल इतक्या कोटी मालमत्तेवर टाच

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : पंजाब बँक गैरव्यवहार प्रकरणातील फरार हिरे व्यापारी नीरव मोदी याच्या ३२९.६६ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणल्याचे सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आज सांगितले. फरार आर्थिक गुन्हेगार कायद्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आल्याचे ‘ईडी’ने आज प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. जप्त केलेल्या मालमत्तेमध्ये मुंबईतील वरळी येथील ‘समुद्र महाल’ इमारतीमधील चार सदनिका, अलिबाग येथील बंगला आणि जमीन, जैसलमेरमधील पवन ऊर्जा प्रकल्प, लंडनमधील सदनिका, संयुक्त अरब अमिरातीमधील काही सदनिका, समभाग आणि बँकेतील ठेवी यांचा समावेश असल्याचे ‘ईडी’ने सांगितले. 

कोरोनावर आणखी एक औषध लवकरच; प्रसिद्ध फार्मा कंपनीने केली घोषणा
मुंबई येथील विशेष न्यायालयाने ८ जूनला ‘ईडी’ला नीरवची मालमत्ता जप्त करण्याचे अधिकार दिले होते. ‘ईडी’ने आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत नीरव मोदीच्या २,३४८ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर आतापर्यंत टाच आणली आहे. नीरव मोदी, त्याचा मामा मेहूल चोक्सी आणि इतरांवर पंजाब नॅशनल बँकेची दोन अब्ज डॉलरची फसवणूक केल्याचा आरोप आहे.

फरार आर्थिक गुन्हेगार कायद्या, 2018 अतंर्गत मोदीच्या मालमत्तेची जप्ती करण्यात आली आहे. 48 वर्षीय मोदीवरील मालमत्ता जप्तीची प्रक्रिया पुढेही सुरुच राहणार आहे. मुंबईच्या एका विशेष न्यायालयाने 8 जून रोजी संपत्ती जप्तीसाठी एका एजेंसीला अधिकृत केले आहे. नीरव मोदी याला पाच वर्षांपूर्वी 5 डिसेंबरला याच न्यायालयाने फरार आर्थिक गुन्हेगार म्हणून घोषीत केले होते.

हातात नाही छदाम.. उभा ठाकला खरीप हंगाम...
ईडीने (enforcement directorate) मागील महिन्यात नीरव मोदी आणि मेहूल चोक्सी यांच्याकडील जवळजवळ 1350 करोड रुपयांचे 2300 किलो पॉलिश केलेले हिरे, आणि दागिने भारत सरकारने जप्त केले आहेत. नीरव आणि चोक्सी यांनी चौकशी दरम्यान या दागिन्यांना हाँगकाँग येथे पाठवले होते, भारत सरकारने हे दागिने यशस्वीरीत्या ताब्यात घेतले आहेत. भारतात आणलेल्या या दागिन्यांमध्ये पॉलिश केलेले हिरे, मोती आणि चांदीचे आभूषण यांचा समावेश आहे. तपासकर्त्यांनी या सर्व सामानांची किंमत 1, 350 कोटी सांगितली आहे.

loading image