आयआयटी गोव्याच्या संचालकपदी मिश्रा

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 24 डिसेंबर 2016

नवी दिल्ली - उच्चशिक्षणाच्या क्षेत्रात स्वतःचे खास स्थान निर्माण करणाऱ्या भारतीय तंत्रज्ञान संस्थांपैकी (आयआयटी) गोव्यासह पाच नव्या संस्थांच्या रिक्त पदांवर संचालकांची नियुक्ती आज करण्यात आली. गोवा आयआयटीच्या संचालकपदी बर्दकांत मिश्रा यांची नियुक्ती झाली आहे. या पाचही आयआयटी संस्था या वर्षीपासूनच अस्तित्वात आल्या आहेत.

आयआयटी संचालकपद हे प्रतिष्ठेचे मानले जाते. देशात 23 आयआयटी आहेत. यापैकी गोवा, धारवाड, भिलाई, गोवा, जम्मू व धनबाद आयआयटी याच वर्षी अस्तित्वात आल्या आहेत. पलक्कड व तिरुपती येथील संस्था 2015 मध्ये सुरू झाल्या. यातील जम्मू वगळता इतर सर्व संचालकांची नियुक्ती करण्यात आली. केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज सायंकाळी या नियुक्‍त्यांच्या अंतिम आदेशांवर स्वाक्षरी केली. नव्या संचालकांची नावे अशी - एस. पासुमासुथू (धारवाड), मिश्रा (गोवा), के. एन. सत्यनारायण, रजत मोना (भिलई) व पी. बी. सुनीलकुमार (पलक्कड).

स्वातंत्र्योत्तर काळात तंत्रशिक्षणाला वाव देण्यासाठी नेहरू सरकारने आयआयटीची पायाभरणी केली. रुरकी येथे 1947 मध्ये भारतातील पहिल्या आयआयटीची पायाभरणी झाली. 50 च्या दशकात मुंबई व खरगपूरसह आणखी चार आणि 1961 मध्ये दिल्ली आयआयटीची स्थापना करण्यात आली. या संस्थांची स्वायतत्ता कायम राहावी, यासाठी केंद्राने 1961 मध्ये आयआयटी कायदाही संसदेत मंजूर केला. देशभरात सध्या नव्या-जुन्या 23 आयआयटी संस्था कार्यरत आहेत. आयआयटी नियामक मंडळाचे केंद्रीय शिक्षणमंत्री हे सहअध्यक्ष असतात.

Web Title: Selection of IIT Directors