माध्यमांसाठी स्वयंनियंत्रणच महत्त्वाचे : वेंकय्या नायडू

वृत्तसंस्था
शुक्रवार, 28 ऑक्टोबर 2016

नवी दिल्ली - लोकशाहीमध्ये प्रसारमाध्यमांवर बंधने घातली जाऊ शकत नाहीत, यासाठी स्वयंनियंत्रणच चांगले असल्याचे सांगत माहिती आणि प्रसारणमंत्री एम. वेंकय्या नायडू यांनी सोशल मीडिया मात्र नियंत्रणाबाहेर गेली असल्याचे स्पष्ट केले. लोकशाहीमध्ये राज्यघटनेने सर्वांनाच अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले असल्याने माध्यमांवर नियंत्रण ठेवता येऊ शकत नाही. स्वयंनियंत्रण हे चांगले असल्याचे सांगत, यासाठी कोणते विधेयक नाही, तर राजकीय इच्छाशक्ती आणि प्रशासकीय कौशल्य हवे असल्याचेही नायडू यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.

अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर होतो, तेव्हा कायदा त्यात हस्तक्षेप करतो. माध्यमांवर कोणतीही नवी बंधने घालण्याचा आमच्या सरकारचा विचार नाही; पण यातील भागधारकांनी विविध मार्गांचा अवलंब करताना जबाबदारीने वागावे. ज्यामुळे देशहिताला बाधा येईल, तसेच हिंसाचारास चिथावणी मिळले, अशा बातम्या प्रसारित केल्या जाऊ नयेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सोशल मीडियाबाबत चिंता
मुख्य प्रवाहातील माध्यमे आणि पत्रकारांसाठी संघटना आणि त्यांच्या व्यवस्थापनाने काही नियम निश्‍चित केले आहेत; पण सोशल मीडियावर मात्र कोणतीही सेन्सॉरशिप नसल्याने काही गोष्टी थेटपणे लोकांपर्यंत पोचतात. सोशल मीडिया त्याची मर्यादा ओलांडत असल्याची भावना सध्या समाज मनामध्ये बळावताना दिसून येते. यावर आपल्याला मार्ग शोधायला हवा. सोशल मीडियावर नियंत्रण ठेवणारे अनेक कायदे आहेत. त्यांची योग्य पद्धतीने अंमलबजावणी होणे गरजेचे असल्याचे नायडू यांनी नमूद केले.

Web Title: Self control needed in Media : Naidu