सेल्फीची क्रेझ ठरतेय जीवघेणी!

Selfie
Selfie

नवी दिल्ली : युवकांमध्ये वाढत असलेली 'सेल्फी'ची क्रेझ घातक ठरत असून, त्यात भारत अव्वल आहे. गेल्या सहा वर्षांत जगभरात तब्बल 259 जणांचा 'सेल्फी' घेताना मृत्यू झाला आहे. त्यात 159 जण भारतातील असल्याचे 'जर्नल ऑफ फॅमिली मेडिसिन अँड प्रायमरी केअर' या नियतकालिकाने नमूद केले आहे.

2011 ते 2017 या काळातील ही आकडेवारी आहे. 'सेल्फी' मृत्यूमध्ये भारतापाठोपाठ रशिया, अमेरिका आणि पाकिस्तान यांचा क्रमांक आहे. 

घातक क्रेझ 
- मरण पावलेल्यांत वय वर्षे 20 ते 29 या वयोगटातील युवक सर्वाधिक. 
- भारतात तलावात किंवा समुद्रात बुडून मरणाऱ्यांचे प्रमाण जास्त. 
- धावत्या रेल्वेगाडीपुढे येणे, हिंस्त्र जनावरांपुढे जाणे. 
- भारतात सुमारे 90 कोटी लोक मोबाईल फोनधारक. 
- 'सेल्फी'च्या नादात जीव गमावणाऱ्यांत 72 टक्के पुरुष आहेत. 
 
परदेशांत काय? 
- उंच इमारतींवर किंवा जंगली जनावरांपुढे जाऊन 'सेल्फी'च्या नादात युवकांचे मृत्यू.   

देश  मृत्यू 
भारत 159 
रशिया 16 
अमेरिका 14 
पाकिस्तान 13
क्रोएशिया 11

 (आकडेवारी 2011-2017 ची)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com