esakal | काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ऑस्कर फर्नांडिस यांचं निधन
sakal

बोलून बातमी शोधा

Oscar Fernandise

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ऑस्कर फर्नांडिस यांचं निधन

sakal_logo
By
अमित उजागरे

नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ऑस्कर फर्नांडिस यांचं सोमवारी निधन झालं, ते ८० वर्षांचे होते. जुलै महिन्यात घरात योगासनं करताना ते तोल जाऊन पडले यामध्ये त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. मार लागल्याने त्यांच्या मेंदूमध्ये रक्ताच्या गाठी झाल्या होत्या. त्यामुळे त्यांच्यावर मेंदू शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. त्यानंतर त्यांची प्रकृती खालावली होती, अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली.

फर्नांडिस यांच्या निधनावर काँग्रेसनं ट्विट केलं असून श्रद्धांजली वाहत त्यांच्या कुटुंबाचे सांत्वन केले आहे. "फर्नांडिस हे काँग्रेसचे सच्चे कार्यकर्ते होते. त्यांची दूरदृष्टीचा त्यांच्या काळातील राजकारणावर मोठा प्रभाव होता. त्यामुळे काँग्रेस परिवार त्यांच्या मार्गदर्शनाला मुकली आहे," असं काँग्रेसच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील माजी राज्यसभा खासदार ऑस्कर फर्नांडिस यांना श्रद्धांजली वाहिली. "फर्नांडिस यांचे कुटुंबिय आणि हितचिंतकांचे मी सांत्वन करतो असंही पंतप्रधान मोदी यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे."

हेही वाचा: ठाकरे सरकार देणार चंद्रकांत पाटलांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे

ऑस्कर फर्नांडिस यांनी त्यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात १९७० मध्ये केली. १९८० मध्ये कर्नाटकातील उडुपी मतदारसंघातून ते पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले. त्यानंतर १९८४, १९८९, १९९१ आणि १९९६ मध्ये ते याचं मतदारसंघातून खासदार झाले. त्यानंतर १९९८ मध्ये ते राज्यसभेवर निवडून गेले त्यानंतर २००४ मध्ये ते पुन्हा राज्यसभेवर निवडून आले.

हेही वाचा: PM मोदींकडून आजी-माजी मुख्यमंत्र्यांना सदिच्छा; रुपाणींना म्हणाले, 'तुम्ही...'

युपीए सरकारमध्ये त्यांनी रस्ते वाहतुक मंत्री म्हणून काम पाहिलं. फर्नांडिस हे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या दोघांचे विश्वासून नेते मानले जात होते. राजीव गांधी यांचे संसदीय सचिव म्हणूनही त्यांनी काम पाहिलं होतं.

loading image
go to top