
सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ वकील व कायदेपंडित डॉ. एन. एम. घटाटे (वय ८३) यांचे आज येथे निधन झाले. गेले काही दिवस ते आजारी होते. त्यांच्या मागे पत्नी शीला आणि दोन मुले असा परिवार आहे.
नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ वकील व कायदेपंडित डॉ. एन. एम. घटाटे (वय ८३) यांचे आज येथे निधन झाले. गेले काही दिवस ते आजारी होते. त्यांच्या मागे पत्नी शीला आणि दोन मुले असा परिवार आहे.
जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या घनिष्ठ मित्रांमध्ये त्यांची गणना होती. अत्यंत मोकळ्या, मनमिळाऊ व्यक्तिमत्वाचे घटाटे मित्रपरिवारात ‘अप्पा’ नावाने ओळखले जात. ते मूळचे नागपूरचे. रा. स्व. संघाशी त्यांचा जीवनभर संबंध राहिला. त्यांचे वडिल रा. स्व. संघाच्या स्थापनेत सहभागी होते. घटाटे हे कायदा आयोगाचे सदस्य होते. ‘डेथ अंडर द शॅडो ऑफ ज्युडिशियरी’ हे फाशीच्या शिक्षेबाबत विवेचन करणारे पुस्तक त्यांनी लिहिले होते. या मध्ये या शिक्षेची चिकित्सा करतानाच वेगवेगळ्या कालखंडात शिक्षेचे स्वरुप कसे बदलत गेले याचा आढावा त्यांनी घेतला होता. आणीबाणीच्या संदर्भात त्यांनी ‘इमर्जन्सी, कॉन्स्टिट्यूशन अँड डेमॉक्रसी’ हे पुस्तक लिहिले. भारताच्या निःशस्त्रीकरणाच्या धोरणावरही त्यांनी विशेष चिकित्सात्मक ग्रंथ लिहिला.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
कायद्याची पदवी घेऊन दिल्लीला वकिली करण्यासाठी आलेल्या घटाटे यांनी सुरुवातीला कृष्ण मेनन यांचे सहाय्यक म्हणून काम केले. कृष्ण मेनन हे पुढे सक्रिय राजकारणात गेले व संरक्षणमंत्री झाले. घटाटे यांना मेनन यांच्याबद्दल कमालीचा आदर होता. याच काळात ते अटलबिहार वाजपेयी यांच्या सहवासात आले. त्यानंतर त्यांची मैत्री अतूट व अखंड राहिली. वाजपेयी यांनी त्यांच्या तीन अतिनिकटच्या मित्रांपैकी एक म्हणून घटाटे यांना स्थान दिले होते. घटाटे यांनी वाजपेयींच्या संसदीय भाषणांच्या संकलनाचे मोठे काम केले. ‘मेरी संसदीय यात्रा’ या शीर्षकाने त्यांनी तीन खंडात हे संकलन केले. वाजपेयी हे आघाडी सरकारचे पंतप्रधान झाले. त्यांच्या त्या कारकिर्दीच्या अनुषंगाने त्यांनी ‘गठबंधन की राजनीती’ हे एक पुस्तक लिहिले.