नोटा बदलणारा 'आरबीआय'चा वरिष्ठ अधिकारी अटकेत

वृत्तसंस्था
मंगळवार, 13 डिसेंबर 2016

नवी दिल्ली- रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) वरिष्ठ अधिकाऱयाला नोटा बदलीप्रकरणी बंगळूरमधून अटक करण्यात आली आहे, अशी माहिती वृत्तसंस्थांनी आज (मंगळवार) दिली.

वृत्तसंस्थानी दिलेल्या वृत्तानुसार, के. मायकल असे अटक करण्यात आलेल्या अधिकाऱयाचे नाव आहे. रिझर्व्ह बँकेच्या बंगळूर शाखेत ते सीनियर स्पेशल असिस्टंट पदावर कार्यरत आहेत. नोटा बदलीप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली असून, याबाबत पुढील तपास सुरू आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर रोजी पाचशे व हजार रुपयांच्या नोटांवर बंदी घातली आहे. यानंतर काळा पैसा असणाऱयांचे धाबे दणाणले आहेत. विविध मार्गांनी ते नोटा बदली करण्याचा प्रयत्न करत आहेत. देशभरात अधिकाऱयांना हाताशी धरण्याच्या प्रयत्नात अनेकजण अडकले आहेत. परंतु, 'आरबीआय'चा अधिकाऱी जाळ्यात सापडण्याचा प्रकार धक्कादायक आहे.

दरम्यान, शहरामध्ये नोटाबंदीच्या निर्णयानंतर बेकायदेशीररित्या नोटा बदलून देणाऱ्या एका मोठ्‌या टोळीस पकडण्यामध्ये सक्‍तवसुली संचलनालयास (ईडी) यश आले आहे. या प्रकरणासंदर्भात ईडीकडून कर्नाटकमध्ये सात जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 93 लाख रुपये किंमतीच्या दोन हजारांच्या नव्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.

Web Title: Senior RBI official arrested for 'illegal currency exchange'