एस. सोमनाथ बनले नवे ISRO प्रमुख; के. सिवन यांची घेणार जागा

एस. सोमनाथ यांनी GSLV Mk-III लॉन्चर विकसित करण्यात महत्वाची भूमिका बजावली होती.
S Somanath
S Somanath

नवी दिल्ली : वरिष्ठ रॉकेट वैज्ञानिक एस. सोमनाथ हे आता भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (ISRO) नवे प्रमुख असणार आहेत. केंद्र सरकारनं १२ जानेवारी रोजी त्यांची नियुक्ती जाहीर केली. नव्या इस्रो प्रमुखांचा कार्यकाळ हा तीन वर्षांसाठी असणार आहे. मावळते प्रमुख के. सिवन यांची ते जागा घेतील. (Senior rocket scientist S Somanath is new Isro chairman)

एस. सोमनाथ यांनी GSLV Mk-III लॉन्चर विकसित करण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यांमध्ये PSLVच्या एकीकरणासाठी ते टीम लीडर होते. एस. सोमनाथ हे २२ जानेवारी २०१८ पासून विक्रम साराभाई अंतराळ केंद्राचं नेतृत्व करत आहेत. तर जून २०१० ते २०१४ पर्यंत ते GSLV MK-III चे प्रोजेक्ट डायरेक्टर होते.

S Somanath
कोव्हॅक्सिनचा बूस्टर डोस ओमिक्रॉन, डेल्टावर भारी - भारत बायोटेक

एस. सोमनाथ यांनी कोल्लम येथील टीकेएम अभियांत्रिकी महाविद्यालयातून मॅकेनिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी मिळवली. त्यानंतर बंगळुरुच्या भारतीय विज्ञान संस्थानमधून त्यांनी एअरोस्पेस इंजिनिअरिंगमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. त्यानंतर १९८५ मध्ये त्यांनी VSSC मध्ये प्रवेश घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com