कोरोनाचा सर्वाधिक धोका ज्येष्ठांनाच 

सकाळ न्यूज नेटवर्क
Thursday, 15 October 2020

मागील पाच आठवड्यांत भारतात दररोज नव्या रुग्णांच्या संख्येत सातत्याने घसरण होत असल्याचेही सांगण्यात आले. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या आज ७२ लाखांवर तर मृतांचा आकडा १ लाख २० हजारांवर गेला. 

नवी दिल्ली - कोरोना महामारीवर मात करणाऱ्यांच्या संख्येत भारत जगात अव्वल क्रमांकावर असला तरी यामुळे जीव गमावलेल्यांची संख्या देशात एक लाखावर पोचली आहे. कोविड-१९ विषाणूंचा सर्वाधिक आणि शब्दशः जीवघेणा फटका ६० वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिकांनाच बसतो हे वास्तव अजूनही कायम आहे, याचा पुनरुच्चार केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी आज ट्‌विटद्वारे केला आहे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

तरुणांमधील चांगल्या प्रतिकार क्षमतेमुळे कोरोनाचा प्रभाव त्यांच्यावर तुलनेने कमी जाणवला तरी त्यांनी ‘मी तरुण आहे म्हणून मला कोरोना संक्रमण होणार नाही,’ या भ्रमात बिलकूल राहू नये. मास्क-हात धुणे-सॅनिटायजर व सुरक्षित अंतरभान पाळणे ही पथ्ये त्यांनी कायम सक्तीने पाळावीत व चुकीच्या गैरसमजात राहून स्वतःला व दुसऱ्यालाही जिवाला धोक्‍यात ढकलू नये, असा सल्ला आरोग्य मंत्रालयाने दिला आहे.

आगामी थंडीच्या दिवसांत कोरोनाचा फुफुसांवरील हल्ला वाढू शकतो, असाही इशारा यंत्रणेने दिला आहे. दरम्यान, कोरोनाला हरविणाऱ्यांमध्ये जगाच्या तुलनेत सर्वांत जास्त म्हणजे ६२,२७,२९५ भारतीय आहेत, याकडे आरोग्य मंत्रालयाने लक्ष वेधले आहे. मागील पाच आठवड्यांत भारतात दररोज नव्या रुग्णांच्या संख्येत सातत्याने घसरण होत असल्याचेही सांगण्यात आले. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या आज ७२ लाखांवर तर मृतांचा आकडा १ लाख २० हजारांवर गेला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

वयोगट...........मृत्युदर (टक्क्यांत) 
१८-२५............ १ 
२६-४४............ १० 
४५-६०............३५ 
६०.................. ५३


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Seniors are most at risk from corona