'लशीची वाट पाहणा-यांनो धीर सोडू नका, सर्वांना लस मिळणार' 

serum CEO adar poonawalla to nations waiting for covidshield says please be patient
serum CEO adar poonawalla to nations waiting for covidshield says please be patient
Updated on

मुंबई - सगळ्या जगाचे लक्ष कोरोनाच्या लशीकडे लागले आहे. आपल्याला कधी लस मिळते आणि आपण कोरोनाचा बिमोड करतोय असा सर्वांचा प्रयत्न आहे. अशावेळी अद्याप काही देशांना कोरोनाची लस मिळालेली नाहीये. त्यामुळे त्या देशांमध्ये भीती आणि संभ्रमाचे वातावरण तयार झाले आहे. याप्रसंगी सिरम इन्स्टि्युटचे सीईओ अदर पूनावाला यांनी त्या देशांना शांतता आणि धीर न सोडण्याचे आवाहन केले आहे.

जे देश कोविडच्या लशीची वाट पाहत आहेत त्यांनी घाबरण्याचे काही कारण नाही. त्यांनी थोडा वेळ धीर धरावा. असे पूनावाला यांनी सांगितले आहे. कोविशिल्ड लशीची वाट पाहणा-यांना आता पूनावाला यांनी धीर देण्यास सुरुवात केली आहे. सिरम कंपनीच्या वतीने कोविडवर लशीची निर्मिती करण्यात येत आहे. ज्यात ऑक्सफोर्ड विद्यापीठ आणि ब्रिटिश - स्वीडिश कंपनी एस्ट्रोजेन यांचाही निर्मिती प्रक्रियेत समावेश आहे. अदर पूनावाला यांनी आपल्या व्टिटरच्या माध्यमातून नवीन माहिती शेअर केली आहे. त्यात त्यांनी सांगितले आहे की, ज्या देशांनी कोविशिल्डची मागणी केली आहे त्या देशांतील लोकांना आणि नागरिकांना माझे सांगणे आहे की, तुम्ही सर्वांनी थोडा धीर बाळगावा. तुमच्यापर्यत लवकरात लवकर लस पोहचणार आहे.

पूनावाला यांनी सध्याच्या घडीला आपल्या समोर जे महत्वाचे प्रश्न आहेत ते पूर्ण करण्यासाठी प्राधान्य़क्रम देणार असल्याचे सांगितले आहे. अद्याप जगातील अनेक देशांमध्ये कोविडची लस पोहचलेली नाही. त्याची निर्मिती करणे आव्हानात्मक असून ते आपण पूर्ण करणार असल्य़ाचेही त्यांनी सांगितले आहे. कोविडशिल्ड ही अशी एक लस आहे जी औषध निर्माण संस्थेच्या (डीसीजीआय) वतीनं मान्यताप्राप्त आहे.

मागील महिन्यात एका वृत्तवाहिनीशी बोलताना पूनावाला यांनी सांगितले होते की, जेव्हा लशीच्या निर्मितीची गोष्ट समोर येते तेव्हा प्राधान्य सर्वात प्रथम भारताला दिले जाणार आहे. पुढील दोन ते तीन आठवड्यात जवळपास 30 देशांपर्यत कोविडशिल्ड पोहचलेली असेल. जेव्हा आपण लस बाहेर देशात पाठवणार आहोत त्यावेळी त्याचा परिणाम भारतातील लशीच्या निर्मितीवर होणार नाही. हे सर्वांनी लक्षात घ्यावे.  
 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com