
आजच्या परिस्थितीमध्ये भारताप्रमाणेच जगभरातील लोकांचे प्राण आणि रोजीरोटी वाचविणे हेच सर्वांत मोठे काम आहे.
नवी दिल्ली- कोरोनाच्या लशीवरून एकीकडे केंद्र सरकार विरुद्ध विरोधी पक्ष असा संघर्ष पेटला असताना सीरम आणि भारत बायोटेक या कंपन्याही आमनेसामने आल्या होत्या. अखेर या वादामध्ये मंगळवारी दोन्ही कंपन्यांनी संयुक्त निवेदन प्रसिद्ध करत त्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. देशाला एकत्रितपणे कोरोनाच्या लशीचा पुरवठा करण्याची तयारी या कंपन्यांनी दर्शविली आहे.
आज दिवसभरात: मनसेचा राडा ते ममतांना धक्का! महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर
आजच्या परिस्थितीमध्ये भारताप्रमाणेच जगभरातील लोकांचे प्राण आणि रोजीरोटी वाचविणे हेच सर्वांत मोठे काम आहे. कोरोनावरील लशी या वैश्विक जनआरोग्य वस्तू असून त्यांच्यामध्ये लोकांचे प्राण वाचविण्याची मोठी क्षमता असल्याचे सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला आणि भारत बायोटेकचे अध्यक्ष कृष्णा एल्ला यांनी प्रसिद्धीस दिलेल्या संयुक्त निवेदनामध्ये म्हटले आहे. या दोन्ही कंपन्या लसीकरणाच्या आघाडीवर वेगाने काम करत असून देशासह जगभरातील लोकांना कोरोनाची लस सुलभरीत्या उपलब्ध करून देणे हे आम्ही आमचे कर्तव्य समजतो, असेही निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे.
तत्पूर्वी भारत बायोटेकने तयार केलेल्या कोव्हॅक्सिन या लशीच्या सुरक्षिततेवर विरोधकांप्रमाणेच वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांनी शंका उपस्थित केल्याने कंपनीचे अध्यक्ष कृष्णा एल्ला यांनी खेद व्यक्त केला होता. भारत बायोटेक लवकरच आपला डाटा सरकारसमोर ठेवेल, असं ते म्हणाले होते. तसेच कोवॅक्सिनने चांगले परिणाम दाखवले असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला.
Gold Price - सोन्यासह चांदीच्या दरातही वाढ; जाणून घ्या आजचे भाव
दरम्यान, नव्या वर्षाच्या सुरुवातीला भारताला दोन आनंदाच्या बातम्या मिळाल्या. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनच्या आपत्कालीन वापरासाठी मंजुरी द्यावी अशी शिफारस कोरोना लशीसंबंधी तज्ज्ञ समितीने केली होती. त्यानंतर 3 जानेवारीला भारताच्या डीसीजीआयने लशीला मंजुरी दिली. याकाळात भारतात लशीकरणाची रंगीत तालीम घेण्यात आली आहे. आता 13 जानेवारीपासून देशातील कोरोना वॉरियर्संना लस दिली जाण्याची शक्यता आहे.