Gold Price - सोन्यासह चांदीच्या दरातही वाढ; जाणून घ्या आजचे भाव

टीम ई सकाळ
Tuesday, 5 January 2021

भारतीय सराफ बाजारात आज पुन्हा सोन्याच्या दरात वाढ झाल्याचं बघायला मिळालं. यामुळे सोन्याचा दर जवळपास 51 हजार रुपयांपर्यंत पोहोचला आहे.

नवी दिल्ली  - भारतीय सराफ बाजारात आज पुन्हा सोन्याच्या दरात वाढ झाल्याचं बघायला मिळालं. यामुळे सोन्याचा दर जवळपास 51 हजार रुपयांपर्यंत पोहोचला आहे. दिल्लीतील सराफ बाजारात 5 जानेवारी 2021 ला सोन्याच्या दरात 335 रुपयांची वाढ झाली. तर चांदीचा दर किलोमागे 382 रुपये इतका वाढला. सोमवारी दिल्लीत सोन्याचे दर 50 हजार 634 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी होती. तर चांदी 67 हजार 311 रुपये प्रति किलो इतकी होती.

मंगळवारी सोन्याचा दर 335 रुपये प्रति दहा ग्रॅम इतका वाढला. दिल्लीत 99.9 ग्रॅम शुद्ध सोन्याचा दर आता 50 हजार 969 रुपये प्रति दहा ग्रॅम इतका झाला आहे. याआधी सोन्याचा दर 50 हजार 634 रुपये इतका होता. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर 1942 डॉलर प्रति औंस इतका होता. 

हे वाचा - केंद्रीय कर्मचार्‍यांना सरकारने दिली नवीन वर्षाची भेट

चांदीच्या दरातही मंगळवारी किरकोळ वाढ झाली. दिल्लीत सराफ बाजारात चांदीची किंमत 382 रुपये इतकी वाढली. आता चांदीचा दर 69 हजार 693 रुपये प्रति किलोग्रॅम इतकी झाली. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचे आजचे दर 27.30 डॉलर प्रति औंस इतके होते. 

हे वाचा - अर्थचक्र सुधाराचे संकेत | इंधनाचा खप पूर्ववत होण्याच्या मार्गावर; 2019 च्या तुलनेत वर्षअखेरीस खपात वाढ

आंतरराष्ट्रीय बाजारात सोने चांदीचे दर स्थिर राहिल्यानंतरही भारतीय बाजारात मात्र दोन्हीमध्ये वाढ दिसली आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत कमी झाली. डॉलरच्या तुलनेत रुपया 3 पैशांनी कमी होऊन 73.15 रुपयांवर पोहोचला. यामुळे सोन्याच्या दरात वाढ झाली. अजुनही लोक सोन्यामध्ये गुंतवणूक करणंच सुरक्षित मानत असल्याचं तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gold price today silver rate in india know rates