आज दिवसभरात: मनसेचा राडा ते ममतांना धक्का! महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 5 January 2021

दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी येथे वाचा

1. 'ईडी'च्या कारभारावरच प्रश्नचिन्ह; पुण्यात ऍड. सरोदेंकडे आली दुसरीच व्यक्ती

एकनाथ खडसे यांच्या भूखंड घोटाळ्यासंदर्भात ईडीचे अधिकारी आज खडसेंच्या विरोधात केस लढवत असलेले अंजली दमानियाचे वकिल ऍड. असीम सरोदे यांच्या कार्यालयात येणार होते. पण, यात वेगळाच ट्विस्ट आला आहे. सविस्तर बातमी- 

2. दादाच्या आजारपणाचा कंपनीला धसका; जाहिरात घेतली मागे

भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार आणि भारतीय क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष (BCCI) सौरव गांगुली यांना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे ते हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. त्यातच अदानी विलमार कंपनीने माजी कर्णधाराची जाहीरात मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. सविस्तर बातमी-

3.ममतादीदींना आणखी एक धक्का; क्रीडा मंत्र्यांच्या राजीनाम्यावर दिली प्रतिक्रिया

पश्चिम बंगालमध्ये एप्रिल-मे महिन्यात निवडणुका होणार आहे. त्यातच ममता बॅनर्जी यांना अनेक धक्के बसले आहेत. भाजपने ममतांसमोर कडवं आव्हान उभं केलं आहे. तृणमूलच्या एका मंत्र्याने आपला राजीनामा ममतांकडे सोपवला आहे. सविस्तर बातमी-

4.भारतात लसीकरण कधी होणार सुरु? आरोग्य सचिवांनी दिली माहिती

देशातील दोन कोरोना लशींच्या आपत्कालीन वापराला मंजुरी मिळाल्यानंतर लसीकरणाची जोरदार तयारी सुरु झाली आहे. त्यानंतर आरोग्य मंत्रालयाकडून लसीकरणाच्या तारखेबाबत महत्वाची माहिती मिळत आहे. सविस्तर बातमी-

5.एकनाथ शिंदेंच्या कार्यक्रमात मनसे कार्यकर्त्यांचा राडा, घोषणाबाजी करणारे कार्यकर्ते ताब्यात

वसई विरार महापालिकेच्या परिवहन सेवा नूतनीकरण आणि लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम वसई पूर्व वसंत नागरी मैदानावर आयुक्त गंगाथरण डी यांच्या पुढाकारातून ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमात नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. यावेळी मनसे कार्यकर्ते घटनास्थळी आले. सविस्तर बातमी- 

6.'युपीएससी'ची 8 ते 17 जानेवारीपर्यंत परीक्षा ! 'एमपीएससी'ची परीक्षा फेब्रुवारीत?

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 2020 मध्ये सहायक मोटार वाहन निरीक्षक पूर्व परीक्षा, राज्य सेवा पूर्व परीक्षा, महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट- ब संयुक्‍त पूर्व परीक्षा, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षेसाठी जाहीरात काढली. मात्र, 9 सप्टेंबर 2020 रोजी सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाच्या 'एसईबीसी' आरक्षणास स्थगिती दिली. सविस्तर बातमी-

7. लोकसभा अध्यक्षांच्या मुलीने केली कमाल; पहिल्याच प्रयत्नात झाली IAS

लोकसभा अध्यक्ष ओम प्रकाश बिर्ला यांची मुलगी अंजली पहिल्याच प्रयत्नात आयएएस झाली आहे. वडिल राजकारणात असतानाही तिने प्रशासकीय क्षेत्रात जाण्याचं ठरवलं आणि यशही मिळवलं. सविस्तर बातमी-

8. विनाघटस्फोट दुसऱ्या लग्नामुळे आईचा मुलावरील ताबा संपुष्टात येत नाही; हायकोर्टाचा निर्णय

एखाद्या अपरिचित व्यक्तीच्या घरी लहान मुलाचे आयुष्य धोक्यात आहे. कारण तिची आई पहिल्या पतीसोबत घटस्फोट न घेताच दुसऱ्या व्यक्तीसोबत वैवाहिक आयुष्य जगत आहे. त्यामुळे मुलाचा ताबा नैसर्गितरित्या त्याच्या वडिलांकडे असायला हवा. एखाद्या अपरिचित व्यक्तीच्या घरी लहानग्याने राहणे धोक्याचे आहे, असं याचिकेत म्हणण्यात आलं होतं. सविस्तर बातमी-

9. अपहरण, खंडणीप्रकरणी भाजप नेते गिरीश महाजन यांच्याविरोधात पुण्यात गुन्हा 

जळगावमधील शैक्षणिक संस्था संचालकाचे अपहरण, मारहाण करीत 5 लाखांच्या  घेतल्या प्रकरणी भाजप नेते गिरीश महाजन यांच्यासह 28 जणाविरुद्ध कोथरुड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल. सविस्तर बातमी-

10. ऑलिम्पिकसाठी हॉकी इंडियाने घेतला मोठा निर्णय

ऑलिम्पिक स्पर्धत दममदार आणि लक्षवेधी खेळ करण्यासाठी भारतीय पुरुष हॉकी संघाची जोरदार तयारी सुरु आहे. जगातील मानाच्या स्पर्धेत उतरण्यापूर्वी इंडियन हॉकीने मोठा निर्णय घेतला आहे. सविस्तर बातमी-

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: today news manse eknath shinde bjp mamta banarjee sports asim sarode pune