''लस टाळणं पडणार महागात, सर्वात मोठा धोका'', अदर पुनावाला म्हणतात... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

adar punawala

''लस टाळणं पडणार महागात, सर्वात मोठा धोका'' - अदर पुनावाला

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

मुंबई : ज्यांनी अजूनही लस (corona vaccine) घेतली नाही, त्यांनी लवकरात लवकर लस घेतली पाहिजे. जर कोणी लस घेण्याचं टाळत असेल, तर सध्या हा सर्वात मोठा धोका आहे. कोरोना प्रादुर्भावात प्रतिबंधक लस बनविणाऱ्या सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ (CEO) अदर पुनावाला (adar punawala) यांनी नागरिकांना आवाहन केले आहे.

लवकरात लवकर घ्या लस..

पुनावाला म्हणाले की, "आज राज्यांमध्ये 200 दशलक्षाहून अधिक डोस उपलब्ध आहेत. त्यामुळे तुम्हा सर्वांना विनंती आहे की, ज्यांनी आतापर्यंत लस घेतलेली नाही त्यांनी लवकरात लवकर लसीचा डोस घ्यावा. लस उद्योगानं राष्ट्रासाठी पुरेसा लस साठा उपलब्ध करुन देण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत. "

देशव्यापी लसीकरण मोहिमेंतर्गत, आतापर्यंत 113 कोटींहून अधिक लसींचे डोस देण्यात आले आहेत. काल 67 लाख 82 हजार 42 डोस देण्यात आले, त्यानंतर आतापर्यंत 113 कोटी 68 लाख 79 हजार 685 डोस लसीचे डोस देण्यात आले आहेत.

हेही वाचा: नव्या वर्षात पगार वाढणार? मोदी सरकार लवकरच करणार घोषणा

दोन डोसमधील अंतर कमी करा, आरोग्यमंत्र्यांची मागणी

कोविड प्रतिबंधात्मक कोविशिल्ड लशीच्या दोन डोसमधील अंतर कमी करावे, अशी मागणी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांच्याकडे केली आहे. मंगळावरी राजेश टोपे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांची निर्माण भवन येथे भेट घेतली. याभेटीदरम्यान राजेश टोपे यांनी राज्यातील परिस्थितीची माहिती मनसुख मांडविया यांना माहिती दिली. यावेळी त्यांनी कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर कमी करण्याची मागणी केली.

हेही वाचा: बुलढाणा - आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू

loading image
go to top