सात भारतीय अभियंत्यांचे अफगाणिस्तानात अपहरण

वृत्तसंस्था
रविवार, 6 मे 2018

अफगाणिस्तानमध्ये सात भारतीय अभियंत्यांचे अपहरण करण्यात आले आहे. अशी माहीती अफगाणिस्थानमधील स्थानिक माध्यमांकडून समजली आहे. सरकार या वृत्ताची शहानिशा करण्याचा प्रयत्न करत आहे. 

काबूल - अफगाणिस्तानमध्ये सात भारतीय अभियंत्यांचे अपहरण करण्यात आले आहे. अशी माहिती अफगाणिस्तानमधील स्थानिक माध्यमांकडून समजली आहे. सरकार या वृत्ताची शहानिशा करण्याचा प्रयत्न करत आहे. 

उत्तर अफगाणिस्तानमधील बागलान प्रांतातील एका वीज प्रकल्पावर हे अभियंते काम करत होते. राॅयटर्सने दिलेल्या माहितीनुसार एका सरकारी वीज प्रकल्पाला भेट द्यायला जात असताना बंदुकीचा धाक दाखवून एका व्यक्तीने त्यांचे अपहरण केले यावेळी त्यांच्यासोबत अफगाणी वाहनचालकही होता.

या घटनेसाठी कोण जबाबदार आहे हे मात्र अजून समजू शकलेले नाही. आतापर्यंत अशा प्रकारच्या सर्व घटनांना तालिबानी जबाबदार आहेत. परंतु, या घटनेची कुठल्याही प्रकारची जबाबदारी त्यांनी अजून घेतलेली नाही. यापूर्वीही 2016 मध्ये एका व्यक्तीचे काबुलमध्ये अपहरण करण्यात आले होते. तब्बल 40 दिवसानंतर त्या व्यक्तीला सोडण्यात आले होते. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Seven Indian Engineers Kidnapped In Afghanistans Baglan