उत्तर प्रदेशात अपघातात सात जण ठार 

पीटीआय
मंगळवार, 12 जून 2018

लखनौ- आग्रा महामार्गावर आज सकाळी झालेल्या बसच्या अपघातात सहा विद्यार्थी आणि शिक्षक ठार झाल्याचे पोलिसांनी सांगितले. आज पहाटे चार वाजता तिरवा भागात हा अपघात झाला. पोलिसांनी सांगितले, की हा अपघात जेव्हा झाला त्या वेळी एका बसमधून दुसऱ्या बसमध्ये डिझेल भरण्याचे काम सुरू होते आणि विद्यार्थी शिक्षकांसोबत चालत चालले होते.

कन्नौज - लखनौ- आग्रा महामार्गावर आज सकाळी झालेल्या बसच्या अपघातात सहा विद्यार्थी आणि शिक्षक ठार झाल्याचे पोलिसांनी सांगितले. आज पहाटे चार वाजता तिरवा भागात हा अपघात झाला. पोलिसांनी सांगितले, की हा अपघात जेव्हा झाला त्या वेळी एका बसमधून दुसऱ्या बसमध्ये डिझेल भरण्याचे काम सुरू होते आणि विद्यार्थी शिक्षकांसोबत चालत चालले होते.

संत कबीरनगर जिल्ह्यातून हे विद्यार्थी हरिद्वारकडे चालले होते. या अपघातात मरण पावलेल्यांबद्दल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दुःख व्यक्त केले आहे. यामध्ये मरण पावलेल्या कुटुंबीयांसाठी प्रत्येकी दोन लाख रुपये आणि जखमींसाठी 50 हजार रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. 

Web Title: Seven people died in an accident in Uttar Pradesh