ISRO प्रमुख सोमनाथ यांचा पगार किती? हर्ष गोयकांनी सांगितला आकडा, नेटकरी म्हणाले....

इस्रोचे अध्यक्ष सोमनाथ यांच्या पगाराची सोशल मीडियावर चर्चा, लोकांचं म्हणणं आहे, 'प्रायवेट सेक्टरमध्ये यापेक्षा जास्त मिळेल'
S Somnath on Chandrayaan 3
S Somnath on Chandrayaan 3eSakal
Updated on

S Somnath Salary:आरपीजी ग्रुपचे चेअरमन हर्ष गोयंका सोशलम मीडियावर मोटिवेशनल आणि मजेशीर पोस्ट शेअर करत असतात. त्यांचे मजेशीर आणि गंभीर ट्वीट्स समाज माध्यमांवर चर्चेचा विषय बनतात. त्यांनी पुन्हा एकदा एक्सवर असाच मजकुर शेअर केला आहे.

या उद्योगपतीने भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे अध्यक्ष एस.सोमनाथ यांचा पगार सांगितला आणि याबद्दल लोकांना त्यांची प्रतिक्रियाही मागितली. गोयंका यांनी आपल्या पोस्टमध्ये सांगितलं की सोमनाथ यांना प्रत्येक महिन्याला २.५ लाख रुपये मिळतात. त्यांनी लोकांना विचारलं की हा पगार त्यांच्यासाठी योग्य आहे का?

हर्ष गोयंका यांनी एक्सवर लिहिले की, "इसरोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांना प्रत्येक महिन्याला २.५ लाख रुपये पगार मिळतो. हे योग्य आहे का ?त्याच्यासारखे लोक पैशाच्या पलीकडे असलेल्या घटकांमुळे कसे प्रेरित होतात ते आम्हाला कळू द्या. ते काय करतात ते विज्ञान आणि संशोधनाप्रती त्यांची आवड आणि समर्पण आहे. राष्ट्राभिमान आहे आणि आपल्या देशासाठी योगदान देण्याची तळमळ आहे. यामध्ये तुमचं लक्ष्य साध्य करणं देखील समाविष्ट आहे. त्यांच्यासारख्या लोकांपुढे मी नतमस्तक आहे. "(Latest Marathi News)

आरपीजी ग्रुपचे चेअरमन गोयंका यांनी केलेल्या या पोस्टवर लोकांच्या ढीगभर प्रतिक्रिया आल्या आहेत. एक वापरकर्ता म्हणाला, "नक्कीचं! इसरोचे अध्यक्ष सोमनाथ सारख्या लोकांचे समर्पण आणि जिद्द अतुलनीय आहे. त्यांचं काम पैशांच्या पुरस्काराच्या पलीकडे आहे, जे विज्ञान, संशोधन आणि देशाच्या चांगल्यासाठी कटिबद्ध आहेत." दुसरा व्यक्ती म्हणाला की, "त्यांना प्रत्येक महिन्याला २५ लाखांपेक्षा अधिक पगार मिळाला पाहिजे. आपण त्यांच्या गुणवत्तेला पुरस्कार मिळाला पाहिजे." आणखी एक व्यक्ती म्हणाला की त्यांच्यावर अन्याय होतोय.

S Somnath on Chandrayaan 3
Chitra Wagh On Uddhav Thackeray: "उद्धव ठाकरे विदूषक"; भाजप नेत्या चित्रा वाघ यांची टीका

एक इंटरनेट वापरकर्ता म्हणाला की, "त्यांना घर, कार यांसारख्या सुविधा मिळाल्या पाहिजे. मात्र, जसं तुम्ही म्हणालात की ते पैशांना आपल स्वारस्य मानत नाहीत. त्यांच्यासाठी यश आणि देशाचा गौरव सर्वात मोठा फॅक्टर आहे." (Latest Marathi News)

आणखी एक व्यक्ती म्हणाला की, "वास्तविक पाहता, तुम्ही जी सॅलरी सांगितली ती बेसिक असल्यासारखी वाटते. यामध्ये त्यांना मिळणारे आणखी भत्ते जोडण्याची गरज आहे. वैज्ञानिकांची चांगल्या पद्धचीने काळजी घेतली पाहिजे, ते त्यांना मिळालं देखील पाहिजे कारण त्यावर त्यांचा हक्क आहे. हे देखील सत्य आहे की ते खासगी क्षेत्रात यापेक्षा जास्त कमाई करु शकतात. "

S Somnath on Chandrayaan 3
Retail inflation: महागाईपासून किंचित दिलासा! किरकोळ महागाईच्या दरात नोंदवली गेली घट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com