शबरीमलातील वाद पेटला; दोन पत्रकारांना मारहाण

शबरीमलातील वाद पेटला; दोन पत्रकारांना मारहाण

नवी दिल्ली : केरळमधील शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश देण्यावरुन वाद पेटला आहे. या वादाला हिंसक वळण लागले आहे. या मंदिरात महिलांना प्रवेश देण्यावरुन अनेक ठिकाणी आंदोलन सुरु असून, या घटनेचे चित्रीकरण करणाऱ्या दोन पत्रकारांना मारहाण करण्यात आली आहे. 

सर्वोच्च न्यायालयाने अय्यप्पा मंदिरात 10 ते 50 वयोगटातील महिलांच्या प्रवेशावर अनेक वर्षांपासून असलेली बंदी उठवली. न्यायालयाने ही बंदी 28 सप्टेंबरला उठवली होती. त्यानंतर महिलांसाठी या मंदिराचे दरवाजे उघडण्यात येणार होते. मात्र, या मंदिरात महिलांच्या प्रवेश न देण्याबाबत काही संघटना ठाम आहेत. त्यामुळे त्या आंदोलन करत आहेत. या आंदोलनाचे चित्रीकरण करणाऱ्या टीव्ही पत्रकारांना मारहाण करण्यात आली. या मारहाणीत ते गंभीर झाले आहेत.   

दरम्यान, शबरीमला मंदिरात भक्तांना घेऊन जाणाऱ्या बसवर हल्ला करण्यात  राज्य परिवहनच्या बसमधून प्रवास करत होती. यावेळी 20 जणांच्या जमावाने बसवर हल्ला करत रिपोर्टरला खाली खेचलं. हा जमाव कर्मा समितीचे असल्याचं सांगितलं जात आहे. महिला पत्रकाराशी वाद घालत मारहाण करण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com