चाहत्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना- शाहरुख

वृत्तसंस्था
मंगळवार, 24 जानेवारी 2017

चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी जास्तीतजास्त शहरांमध्ये पोहचण्यासाठी मी रेल्वेने प्रवास करण्याचा निर्णय घेतला. भारतीय रेल्वेने मी बऱ्याच वर्षांपूर्वी प्रवास केला होता.

नवी दिल्ली - वडोदरा रेल्वे स्थानकावर हृदयविकाराच्या झटक्याने चाहत्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना असून, आम्ही त्याच्या कुटुंबीयांना सर्वोतोपरी मदत करू, असे अभिनेता शाहरुख खान याने म्हटले आहे.

'रईस' या आगामी चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी शाहरुख खान याने राजधानी एक्स्प्रेसने मुंबई ते दिल्ली असा प्रवास केला. शाहरुख रेल्वेने जात असल्याने वडोदरा स्थानकावर मोठी गर्दी झाली होती. त्यावेळी पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जनंतर झालेल्या चेंगराचेंगरीत एका चाहत्याचा हृदयविकाराने मृत्यू झाला. याबद्दल बोलताना शाहरुखने दुःख व्यक्त करत मृत्यू झालेले फहीद खान हे नातेवाईक असल्याचे म्हटले आहे.

शाहरुख म्हणाला, की आम्ही वडोदरा रेल्वे स्थानकावरून गेल्यानंतर ही घटना घडली. ही खूप दुःखद घटना आहे. चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी जास्तीतजास्त शहरांमध्ये पोहचण्यासाठी मी रेल्वेने प्रवास करण्याचा निर्णय घेतला. भारतीय रेल्वेने मी बऱ्याच वर्षांपूर्वी प्रवास केला होता. रईस हा वास्तववादी चित्रपट असून, आम्हाला नव्या चेहऱ्याची गरज होती. यासाठी खूप ऑडिशन्स घेतल्या, त्यानंतर माहिराची निवड करण्यात आली.

Web Title: shah rukh khans vadodra visit by train one died in lathicharge