केंद्र सरकारमध्ये 'शहा'गिरी; प्रत्येक समितीत समावेश

Amit Shah
Amit Shah

नवी दिल्ली : नव्याने सरकार स्थापनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आठ महत्त्वाच्या समित्यांची पुनरर्चना केली आहे. या समित्यांचे वैशिष्ट्य म्हणजे सरकारमधील तिसऱ्या क्रमांकाचे प्रस्थ असलेले गृहमंत्री अमित शहा यांना प्रत्येक समितीत स्थान देण्यात आले. परंतु, दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री असलेले संरक्षण मंत्री राजनाथसिंह केवळ दोनच समित्यांमध्ये आहेत. 

सरकारी अधिकाऱ्यांची नेमणूक, बदल्यांचा निर्णय करणारी नियुक्ती समिती, सुरक्षा विषयक समिती, आर्थिक व्यवहारविषयक समिती, राजकीय व्यवहार, संसदीय कामकाज त्याचप्रमाणे निवास, गुंतवणूक आणि वृद्धी, रोजगार आणि कौशल्य विकास या मंत्रिमंडळ समित्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज पुनरर्चना केली. वरिष्ठ केंद्रीय मंत्री या समित्यांचे सदस्य असतील. स्वतंत्र कार्यभार असलेले राज्यमंत्री विशेष निमंत्रित सदस्य असतील. यातील सहा समित्यांमध्ये पंतप्रधान मोदी आहेत, तर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा सात आणि रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांचा पाच समित्यांमध्ये समावेश करण्यात आला आहे. 
 
सुरक्षाविषयक समिती 
प्रमुख : नरेंद्र मोदी, पंतप्रधान 
सदस्य : संरक्षणमंत्री राजनाथसिंह, गृहमंत्री अमित शहा, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन 

निवासाशी संबंधित समिती 
प्रमुख : अमित शहा 
सदस्य : परिवहनमंत्री नितीन गडकरी, निर्मला सीतारामन, रेल्वेमंत्री पीयूष गोयल 
 
मंत्रिमंडळ नियुक्ती समिती 
पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा 

अर्थव्यवहार समिती 
प्रमुख : नरेंद्र मोदी 
सदस्य : राजनाथसिंह, अमित शहा, नितीन गडकरी, रसायन आणि खत मंत्री सदानंद गौडा, निर्मला सीतारामन, कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर, दूरसंचार मंत्री रवीशंकर प्रसाद, अन्नप्रक्रिया मंत्री हरसिमरत कौर बादल, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, पीयूष गोयल आणि पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान 

संसदीय व्यवहार समिती 
प्रमुख : अमित शहा 
सदस्य : निर्मला सीतारामन, अन्न व नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान, नरेंद्रसिंह तोमर, रवीशंकर प्रसाद, सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गेहलोत, माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर, संसदीय कार्यमंत्री रवीशंकर प्रसाद, संसदीय कार्यमंत्री अर्जुन राम मेघवाल आणि व्ही. मुरलीधरन 
 
राजकीय व्यवहार समिती 
प्रमुख : नरेंद्र मोदी 
सदस्य : अमित शहा, नितीन गडकरी, निर्मला सीतारामन, पियूष गोयल, रामविलास पासवान, नरेंद्रसिंह तोमर, रवीशंकर प्रसाद, हरसिमरत कौर बादल, आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन, अवजड उद्योगमंत्री अरविंद सावंत आणि प्रल्हाद जोशी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com