esakal | Shaheen Cyclone Update - 'शाहीन'ची पश्चिमेकडे वाटचाल; राज्यातील पावसाचा जोर ओसरला
sakal

बोलून बातमी शोधा

Signs of cyclone

चक्रीवादळ आणखी तीव्र होणार असल्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने दिली आहे.

'शाहीन'ची पश्चिमेकडे वाटचाल; राज्यातील पावसाचा जोर ओसरला

sakal_logo
By
टीम ई सकाळ

गेले काही दिवस सुरु असलेल्या गुलाब चक्रीवादळाचा जोर कमी होत असताना 'शाहीन' चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला. गुरुवारपासून हे चक्रीवादळ अरबी समुद्रात दाखल झाले. ओमन देशानं याचे 'शाहीन' असं नाव दिलं. (shaheen cyclone update) दरम्यान उत्तर अरबी समुद्राच्या मध्यवर्ती भागांवर धडकलेले 'शाहीन' चक्रीवादळ पश्चिमेकडे सरकले आहे. आज सकाळपासून ते चाबहार बंदर (इराण) पासून 450 किमी पूर्व-आग्नेयेकडे मार्गस्थ झाले आहे. (shaheen cyclone) त्यामुळे पुढील काही तासांमध्ये हे चक्रीवादळ आणखी तीव्र होणार असल्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने दिली आहे. मात्र याचा भारतावर कोणताही परिणाम होणार नसल्याचेही हवामान खात्याने सांगितले आहे. (India Meteorological Department)

हेही वाचा: जबाबदारी दुसऱ्यावर ढकलू नका, गांधी विचार रुजविणे काम आपलेच : थोरात

दरम्यान, यामुळे उत्तर अरबी समुद्राच्या प्रदेशातील किनारपट्टींना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने शाहीन चक्रीवादळाचा प्रभाव गुजरात (Gujarat) किनारपट्टीकडील भागात जाणवेल, असा अंदाज व्यक्त केला होता. (India Meteorological Department) शाहीन चक्रीवादळ भारतीय किनारपट्टीपासून दूर जात असल्याने ते धडकण्याची शक्यता कमी असल्याचेही सांगण्यात आलं होतं. परंतु, त्याच्या प्रभावामुळे गुजरात आणि सौराष्ट्रच्या किनारी भागांत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.

हेही वाचा: Punjab : भाजपचे मदतनीस बनू नका; हरीश रावतांचा अमरिंदर सिंगांवर निशाणा

शाहीवमुळे वाऱ्याचा प्रचंड वेग आणि मुसळधार पावसाचा (Heavy rain) किनारपट्टीवरील काही प्रदेशांना फटका बसण्याची शक्यता आहे. 'शाहीन'मुळे गुजरात, दमन, दीव, दादरा-नगर हवेली येथील विविध प्रदेशासह उत्तर कोकणातही (Konkan) काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

loading image
go to top