esakal | जबाबदारी दुसऱ्यावर ढकलू नका, गांधी विचार रुजविणे काम आपलेच : थोरात
sakal

बोलून बातमी शोधा

congress leader balasaheb thorat

जबाबदारी दुसऱ्यावर ढकलू नका, गांधी विचार रुजविणे काम आपलेच : थोरात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : तरुणांना महात्मा गांधी माहिती नाहीत यास आपण जबाबदार आहोत. सर्व संतांच्या विचाराचा सार म्हणजे महात्मा गांधी आहेत. सध्या हा विचार संकटात आहे. तरुणांच्या हातातील मोबाईल येणाऱ्या चुकिच्या माहिती मुले त्यांचे वेगळे मत तयार होत आहे. हे रोखायचे असेल तर गांधीजींचे विचार रुजविणे ही जबाबदारी आपली आहे. ती दुसऱ्यावर ढकलून देऊन जमणार नाही, असा सल्ला महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस पदाधिकाऱ्यांना दिला.

काँग्रेसतर्फे स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष व महात्मा गांधी जयंतीनिमित्ताने 'गांधीजींचा मार्ग सत्याग्रह' या छायाचित्र प्रदर्शन सदाशिव पेठेतील श्री शिवाजी मंदिर संस्था येथे आयोजित केले आहे. त्याचे उद्घाटन बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते झाले. शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी, महापालिकेतील गटनेते आबा बागुल, प्रदेश सरचिटणीस व प्रदर्शनाचा आयोजक अभय छाजेड, रोहित टिळक, कमल व्यवहारे आदी यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा: पंजाबमध्ये चाललंय तरी काय? आता CM चन्नी गेले मोदींच्या भेटीला

थोरात म्हणाले, ‘‘लोकमान्य टिळक हे असंतोषाचे जनक होते, त्यांच्यानंतर हा विचार महात्मा यांनी पुढे नेला. गांधीजींच्या सत्याग्रहाने जातीभेद, धर्मभेद विसरून सर्व लोक एकत्र आले. चलेजावच्या घोषणेने देश पेटून उठला होता. पण सध्या माणसा माणसांमध्ये भेद निर्माण करून सत्ता मिळवून भाजप राजकारण करत आहे. भाजपचे हे धोरण देशहिताचे नाही. त्यामुळे त्यास विरोध केला पाहिजे. हा दुसरा स्वातंत्र्य लढा असेल.

महागाई, बेरोजगारी, शेतकरी आंदोलन असे प्रश्‍न असताना पंतप्रधान त्याबद्दल एकदाही बोलत नाहीत. ही मुजोरी मोडून काढण्यासाठी एकत्र आले पाहिजे. मोदी सरकारने जनतेच्या जीवनात आनंद निर्माण करणारे एकही काम केले नाही, अशी टीका थोरात यांनी केली.

loading image
go to top