शाहरूख खान झाला 'बेगाना सनम'; दिल्लीत आंदोलकांनी केले ट्रोल

टीम ई सकाळ
बुधवार, 15 जानेवारी 2020

दिल्लीत सुरू असलेल्या एका आंदोलनात महिलांनी शाहरूख खानला ट्रोल केलं असून, नागरिकत्व सुधारणा कायद्यावर गप्प बसलेल्या शाहरूख खानला 'बेगाना सनम' म्हटलंय. 

नवी दिल्ली : ज्या शहरात जन्म झाला. त्या शहरातील आंदोलनात ट्रोल होण्याची वेळ अभिनेता शाहरूख खानवर आलीय. दिल्लीत सुरू असलेल्या एका आंदोलनात महिलांनी शाहरूख खानला ट्रोल केलं असून, नागरिकत्व सुधारणा कायद्यावर गप्प बसलेल्या शाहरूख खानला 'बेगाना सनम' म्हटलंय. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दिल्लीत शाहीन बाग परिसरात महिलांनी अखंड रास्ता रोको आंदोलन सुरू केले आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात महिलांनी अखंड रास्ता रोको सुरू ठेवल्यानं परिसरात वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला आहे. या आंदोलनात सर्व जाती धर्माच्या महिलांचा समावेश असून, या आंदोलनात लोहरी सणही साजरा करण्यात आला. आंदोलनावेळी महिलांनी गाणी, गाऊन एकमेकिंचा उत्साह वाढवला. त्या गाण्यांमध्ये किंग खान शाहरूख ट्रोल झालाय. शाहीन बागचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. 

शाहरूख हो गया, बेगाना सनम
आंदोलकांनी गाणं गाताना शाहरूख खानच्या दिलवाले दुल्हनियाँ ले जाएँगे या सिनेमातलं गाणं  गाऊन, किंग खानला ट्रोल केलंय. 'तुझे देखा तो ये जाना सनम, शाहरूख हो गया बेगाना सनम.', असं गाणं गायलंय. 'खामोशी तेरी, स्टार डम तेरा', असं गाणं गाऊन आंदोलकांन शाहरूख खानच्या चुप्पीवर बोट ठेवलंय. देशभरात सीएए आणि एनआरसी कायद्यांच्या विरोधात आंदोलन सुरू असताना बॉलिवूडचे अनेक कलाकार गप्प आहेत. त्यात किंग खान शाहरूखचाही समावेश आहे.

छपाक चित्रपटाचा परिणाम; उत्तराखंड सरकारने घेतला 'हा' मोठा निर्णय


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shahrukh khan gets trolled at shine bagh protest in delhi