esakal | 'मोदी सरकारचे रिपोर्ट कार्ड; कोरोना मृत्यूदरात सर्वांत पुढे, जीडीपीत मागे'
sakal

बोलून बातमी शोधा

rahul gandhi narendra modi

राहुल गांधी यांनी म्हटलंय की, नरेंद्र मोदी सरकारच्या रिपोर्ट कार्डमध्ये कोरोना व्हायरसच्या संक्रमणातील मृत्यूदरात भारत आशियायी देशांच्या सर्वांत पुढे तर जीडीपीमध्ये सर्वांत मागे आहे.

'मोदी सरकारचे रिपोर्ट कार्ड; कोरोना मृत्यूदरात सर्वांत पुढे, जीडीपीत मागे'

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज गुरुवारी नरेंद्र मोदी सरकारवर टीका केली आहे. राहुल गांधी यांनी म्हटलंय की, नरेंद्र मोदी सरकारच्या रिपोर्ट कार्डमध्ये भारत कोरोना व्हायरसच्या संक्रमणातील मृत्यूदरात आशियायी देशांच्या सर्वांत पुढे तर जीडीपीमध्ये सर्वांत मागे आहे. त्यांनी ही टीका ट्विटरवर केली आहे. ही टीका करताना त्यांनी आकडेवारीचा संदर्भदेखील सोबत जोडला आहे.

हेही वाचा - इंदिरा गांधी जन्मदिन : त्यांचे पाच असे निर्णय ज्यांनी भारताचे चित्र पालटले

सुप्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ कौशिक बसु यांच्याद्वारे जाहीर केलेल्या आकडेवारींना समोर ठेवत त्यांनी ही टीका केली आहे. त्यांनी या ट्विटमध्ये म्हटलंय की, मोदी सरकारचे रिपोर्ट कार्ड : कोरोना मृत्यूदरात सर्वांत पुढे आणि जीडीपी दरात सर्वांत मागे...राहुल गांधी यांनी आकडेवारी दाखवून देणारा एक फोटो ट्विट केलाय. ज्यामध्ये आशियातील देशांच्या कोरोनाच्या मृत्यूदराची आणि जीडीपीच्या दरांची माहिती आहे. या दोन्ही दरांमध्ये त्यांनी आशियातील इतर देशांशी भारताची तुलना केली आहे.

कोरोना मृत्यूदराचा विचार करायचा झाल्यास यामध्ये भारतच सर्वांत पुढे आहे. अगदी बांग्लादेश, नेपाळ, भुटानसारखे अविकसित राष्ट्रेसुद्धा आपल्यापेक्षा सुस्थितीत आहेत. त्यांचा मृत्यूदर हा भारतापेक्षा कमी आहे. तसेच जीडीपीबाबतची तुलनाही या फोटोत आहे. यामध्ये स्पष्ट दिसून येत आहे की, भारताच्या जीडीपीची वाढ ही - 10.3 इतकी आहे. आपल्यापेक्षा आशियातील अनेक देश पुढे आहेत. यामध्ये पाकिस्तानची अवस्था देखील आपल्यापेक्षा बरीच आहे. कोरोना काळात सर्वच देशांच्या आर्थिक व्यवस्थेत पडझड झाली आहे. मात्र, भारताचा विचार करता भारताची अवस्था सर्वांत वाईट असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली आहे. 

हेही वाचा - सीमाप्रश्न : अजित पवारांचं वक्तव्य कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना झोंबलं

कोरोना लॉकडाऊनच्या काळात अनेकांचे रोजगार गेले आहेत. अर्थव्यवस्था रसातळाला गेली आहे. भारताच्या इतिहासांत एवढ्या खाली जीडीपी कधीच गेला नव्हता, असं आकडेवारी सांगते.