गोव्यात खासगी जागेतही शॅकना परवानगी

shacks.jpg
shacks.jpg

पणजी : गोव्यातील किनारी भागातील खासगी जमिनींत आता पूर्ववत शॅक (तात्पुरती उपहारगृहे) घालता येणार आहेत. त्यासाठी परवानगी देण्याचा निर्णय गोवा किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाने आज घेतला. गेली दोन वर्षे अशा जागेत शॅकना परवानगी देण्यात येत नव्हती.

राष्ट्रीय हरित लवादाने खासगी किनारी जमिनींतील वाळूचे पट्टे, वाळूच्या टेकड्या आणि त्यांची धारण क्षमता याविषयी अभ्यास होईपर्यंत त्या जागेत शॅक उभारण्यास परवानगी देऊ नये असा आदेश दिला होता. त्यानंतर चेन्नई येथील निरंतर किनारी व्यवस्थापनाचे राष्ट्रीय केंद्र या संस्थेकडून हा अभ्यास करवून घेण्यात आला होता. त्या संस्थेने दिलेल्या अहवालावर प्राधिकरणाच्या अनेक बैठकांत आजवर चर्चा झाली आहे. त्यानंतर आजच्या बैठकीत खासगी किनारी जागेतील शॅकना परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे.

पाळोळे येथे शॅक उभारण्यासाठी १३८ अर्ज आले होते त्यापैकी ११९ अर्ज आजच्या बैठकीत ग्राह्य धऱण्यात आले आहेत. पालये येथे एक, केरी येथे दोन, खोला येथे दोन, हणजुणे येथे १० शॅकना परवानगी देण्याचे ठरविण्यात आले आहे. या जागांवर शॅकना परवानगी देता येईल असे प्राधिकरणाकडून पर्यटन खात्याला कळविले जाणार आहे. त्यानंतर पर्यटन खाते त्या जागेवर शॅक उभारण्यासाठी परवाने जारी करणार आहे.

गालजीबाग शॅकमुक्त
समुद्री कासवांची अंडी घालण्याची जागा असल्याने गालजीबाग येथे खासगी जागेतही शॅक घालण्यास परवानगी न देण्याचे गोवा किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाने ठरवले आहे. मोरजी, मांद्रे, आगोंद येथील खासगी जागेत शॅक घालण्यासाठीच्या अर्जांवर प्राधिकरण येत्या ५ रोजी विचार करणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com