मनोहर पर्रीकरांनी गोव्याच्या जनतेचा विश्वासघात केला - दिग्विजय सिंह

वृत्तसंस्था
शनिवार, 1 एप्रिल 2017

नवी दिल्ली- मनोहर पर्रीकरांनी गोव्याच्या जनतेचा विश्वासघात केल्याबद्दल त्यांची माफी मागितली पाहिजे तसेच नितीन गडकरींच्या आमदार खरेदीमुळेच गोव्यात भाजपचे सरकार बनले त्यामुळे पर्रीकरांनी गडकरींचे आभार मानावे असे 'ट्विट' काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी केले आहे.

मनोहर पर्रीकरांनी शुक्रवारी राज्यसभेत दिग्विजय सिंह यांचे गोव्यामध्ये सरकार स्थापन करु दिल्याबद्दल आभार मानले होते. त्यानंतर दिग्विजय सिंह यांनी ट्विट केले कि 'मनोहर पर्रिकरांना यांना आभार मानायचे असतील तर 12 मार्च रोजी सकाळी गोव्याच्या एका हॉटेलमध्ये बसुन आमदार खरेदी करणाऱ्या नितीन गडकरी यांचे आभार त्यांनी मानावे तसेच संविधान, सरकारिया आयोगाच्या सुचना तसेच उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन आणि गोव्याच्या जनतेच्या माताचा अनादर करणाऱ्या राज्यपालांचे आभार मानावे.'

दिग्विजय सिंह यांनी त्यांच्या दुसऱ्या एका ट्विटमध्ये लिहिले आहे कि 'मनोहर पर्रिकर यांना सत्तेची भुक आहे, त्यांनी गोव्याच्या लोकांसोबत विश्वासघात केला आहे व त्याबद्दल त्यांनी जनतेची माफी मागितली पाहिजे.'

नुकत्याच झालेल्या गोवा विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता तरीही भाजपने मनोहर पर्रिकर यांच्या नेत्तृत्त्वाखाली गोव्यात सरकार स्थापन केले. त्यानंतर सरकार स्थापनेसाठी लवकर प्रयत्न केले नाही म्हणुन काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्यावर टीका झाली होती.

Web Title: Shame on you Mr Parrikar says digvijaya singh