शरद पवार नातवासह पोहोचले वाघा बॉर्डरवर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 मे 2019

राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे दुष्काळी दौरा आटोपल्यानंतर थेट वाघा बाॅर्डरला गेले. कृषी अभ्यास दौऱ्यानिमित्त पवार हे पंजाबच्या दौऱ्यावर आहेत.

पुणे : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे दुष्काळी दौरा आटोपल्यानंतर थेट वाघा बाॅर्डरला गेले. कृषी अभ्यास दौऱ्यानिमित्त पवार हे पंजाबच्या दौऱ्यावर आहेत.

माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, व्हीएसआयचे महासंचालक शिवाजीराव देशमुख, रोहित पवार आदी त्यांच्यासोबत आहेत. शिष्टमंडळातील इतर मंडळी अभ्यास दौऱ्यातून वेळ काढून वाघा बाॅर्डरवरील सायंकाळचा समारंभ पाहण्यास जाणार असल्याचे समजल्यानंतर खुद्द पवारही त्यांच्याबोत उत्साहाने सहभागी झाले.

या भेटीचा अनुभव रोहित पवार यांनी सोशल मिडियात शेअर केला आहे. पंजाबच्या भूमीशी साहेबांच एक वेगळ नातं आहे. ऑपरेशन ब्लू स्टार नंतर पंतप्रधान इंदिरा गांधींची हत्या करण्यात आली. त्यानंतर पंजाब अशांत होता. अशा वेळी लोंगोवाल-बादल यांच्यासोबत चर्चा करण्याची जबाबदारी आदरणीय साहेबांनी पार पाडली. त्याच फलित म्हणजे प्रसिद्ध असा राजीव गांधी आणि लोंगोवाल यांच्यात झालेला करार. या करारामुळे भारतातील अस्थिर वातावरण शांत होण्यास मदत झाली,``असा अनुभव त्यांनी मांडला आहे.

संरक्षणमंत्री असताना त्यांना आलेले अनुभव, राष्ट्रीय सुरक्षेच महत्व अशा कित्येक गोष्टींबद्दल साहेब अगदी उत्साहाने आम्हाला सांगत होते, असे रोहित यांनी म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sharad Pawar and Rohit Pawar visits Wagha Border at Punjab