ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मातीत धूळ चारणाऱ्या भारतीय संघाचे अभिनंदन! - शरद पवार

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 19 January 2021

आज भारताने औस्ट्रेलियाविरुद्धचा चौथा कसोटी सामना जिंकला.

पुणे : आज भारताने औस्ट्रेलियाविरुद्धचा चौथा कसोटी सामना जिंकला. चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला 328 धावांचे लक्ष्य दिले होते. हा सामना तीन विकेट्सनी जिंकला आहे. या सामन्याबरोबरच भारताने ही सिरीज देखील 2-1 ने जिंकली आहे. भारतीय संघाच्या या विजयाचे कौतुक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. त्यांनी ट्विट करुन म्हटलंय की, गाबा खेळपट्टीवर ३२ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियन संघाला थरारक कसोटी सामन्यात धूळ चारणाऱ्या भारतीय संघाचे मनपूर्वक अभिनंदन! अजिंक्य रहाणेच्या संघाने बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिका जिंकून नवा इतिहास घडवला.

याशिवाय भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विट करुन भारतीय संघाचे अभिनंदन केलं आहे. मोदींनी ट्विट करत म्हटलंय की, ऑस्ट्रेलियात भारतीय क्रिकेट संघानं मिळवलेल्या विजयामुळे आपण खूप आनंदीत आहोत. भारतीय संघातील खेळाडूंची असीम ऊर्जा आणि विजयाचं वेड दिसून येत होतं. यात त्यांचा ठोस निर्धार, उल्लेखनीय धाडस आणि ठाम निश्चय होता. भारतीय संघाचं अभिनंदन. भविष्यातील प्रयत्नांसाठी भारतीय संघाला खुप शुभेच्छा.

भारताने औस्ट्रेलियाविरुद्धचा चौथा कसोटी सामना जिंकला आहे. चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला 328 धावांचे लक्ष्य दिले होते. चौथ्या दिवसाअखेर टिम इंडियाने बिन बाद 4 धावा केल्या होत्या. पाचव्या दिवशी रोहित-शुभमनने संयमी खेळी करत खेळाला सुरुवात केली. पॅट कमिन्सने रोहितला माघारी धाडत टिम इंडियाला पहिला आणि मोठा धक्का दिला होता. रोहित शर्मा 21 चेंडूत 7 धावा करुन माघारी फिरला आहे. त्यानंतर युवा शुभमन गिलनं पुजाराच्या साथीनं डाव सावरला होता. गिलनं कसोटी कार्दितील दुसरे अर्धशतकही पूर्ण केले. 

शुभमन गिल आणि पुजाराने दमदार भागिदारी करत भारतीय संघाच्या डावाला आकार दिला. या जोडीनं दुसऱ्या विकेटसाठी 114 धावांची खेळी केली. शतकाच्या उंरठ्यावर असलेल्या शुभमन गिलला शतकी कसोटी  सामना खेळणाऱ्या लायनने बाद केले. शुभमन गिलने 91(146) धावा केल्या. पुजारा अर्धशतकी करुन माघारी फिरला. त्यानंतर पंतने अर्धशतक पूर्ण केले.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sharad pawar congratulated Indian cricket team for victory in Australia