

Sharad Pawar Congress Merger nana patole
esakal
NCP Congress Merger : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि काँग्रेसच्या संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले असून, हा प्रस्ताव आजचा नसून खूप आधीपासून प्रक्रियेत असल्याचा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी केला आहे. मतांचे विभाजन थांबवून धर्मनिरपेक्ष विचारांच्या पक्षांनी एकत्र यावे, यासाठी देशपातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे सांगत पटोले यांनी राहुल गांधी, सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनीही या प्रक्रियेवर काम सुरू केल्याचे स्पष्ट केले.