esakal | उद्धव ठाकरेंसोबतच्या बैठकीत काय घडलं? शरद पवारांनी केलं स्पष्ट
sakal

बोलून बातमी शोधा

Sharad-Pawar-Uddhav-Thackeray

महाराष्ट्रातील राजकारण विविध विषयांमुळे चर्चेत असताना शरद पवार यांनी सोमवारी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती.

उद्धव ठाकरेंसोबतच्या बैठकीत काय घडलं? शरद पवारांनी केलं स्पष्ट

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली: महाराष्ट्रात सध्या सचिन वाझे प्रकरण गाजत आहे. या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत. मनसुख हिरेन यांची हत्या सचिन वाझे यांनीच केल्याचा आरोप हिरेन यांच्या पत्नीने केला होता. त्यानंतर विरोधी पक्षाने सचिन वाझेंवर कारवाईची मागणी केली होती. पण गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझेंची बदली केली जाईल असं सांगितलं. या साऱ्या घडामोडींदरम्यान सोमवारी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात बैठक झाली. या बैठकीत नेमकं काय घडलं? हे गुलदस्त्यात होतं. या चर्चांना आज शरद पवार यांनी पूर्णविराम दिला.

काँग्रेसचे केरळमधील नेते चाको यांचा आज दिल्लीत शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत पक्षप्रवेश झाला. यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना पवार यांना उद्धव ठाकरे यांच्या बैठकीबद्दल विचारलं. यावर बोलताना ते म्हणाले, "उद्धव ठाकरेंना मी कोणतेही आदेश देण्यासाठी भेटलो नाही. आम्ही महाराष्ट्रातील सहकारी आहोत. त्यामुळे आम्ही नेहमीच भेट घेत असतो. बैठकीत राज्यातील काही महत्त्वाच्या प्रश्नावर चर्चा झाली. या प्रश्नांवर काम कसं करायचं याबद्दलची रणनीती ठरवण्याबद्दची ती भेट होती. राज्यातील काही समस्यांवर कसं काम करायचं? केंद्राकडून काही मागणी करायची असेल, तर ती कशी आणि कोणी करायची? यासंबंधीच्या विषयांवर आमची चर्चा झाली."

नक्की वाचा- सचिन वाझे प्रकरणात NIAची मोठी कारवाई

राज्यात राष्ट्रीय तपास यंत्रणेने तपासासाठी येण्याबद्दल त्यांनी मत व्यक्त केलं. "एका पोलीस अधिकाऱ्याच्या प्रकरणाचा संपूर्ण सरकारवर परिणाम होईल असं मला वाटत नाही. त्यातही जेव्हा नॅशनल एजन्सी तपास करत असेल, तेव्हा त्यांना सहकार्य केलं पाहिजे. जर कोणी अधिकारांचा गैरवापर करत असेल, तर त्यांना त्याची जागा दाखवली गेलीच पाहिजे. त्यासाठीच नॅशनल एजन्सी राज्यात तपास करत आहे", असे ते म्हणाले.

शरद पवारांचा मोठा खुलासा; अनिल देशमुखांकडेच राहणार गृहखाते

"पश्चिम बंगालमध्ये सध्या केंद्रीय नेते बळाचा वापर करून ममतां बॅनर्जींवर हल्ले घडवू पाहत आहेत. हे सर्व पाहून, जिथं फक्त भाजप विरोधात लढायचं असतं, तेव्हा तिथल्या विरोधकांसोबत आम्ही जातो. प्रत्येक राज्यांची परिस्थिती वेगवेगळी असते, त्यानुसार तिथल्या लोकांच्या अपेक्षेनुसार आम्ही निर्णय घेतो. गेल्या ४० वर्षांपासून आम्ही सोबत आहोत. त्यामुळे अशा पक्षप्रवेशांबद्दल राष्ट्रवादीचे सहकारी पक्ष कधीही नाराजी व्यक्त करणार नाहीत", अशी खात्री त्यांनी व्यक्त केली.

loading image