esakal | शरद पवारांचा मोठा खुलासा; अनिल देशमुखांकडेच राहणार गृहखाते
sakal

बोलून बातमी शोधा

SHARAD PAWAR NCP

पत्रकार परिषदेत शरद पवार यांना राज्यातील घडामोडींबाबत प्रश्न विचारण्यात आले. यामध्ये सचिन वाझे प्रकरणावरून राज्य सरकार अडचणीत आले आहे का असेही त्यांना विचारले गेले.

शरद पवारांचा मोठा खुलासा; अनिल देशमुखांकडेच राहणार गृहखाते

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली - माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी गेल्याच आठवड्यात काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलेले केरळचे ज्येष्ठ नेते पीसी चाको यांच्या पक्षप्रवेश झाला. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांना राज्यातील घडामोडींबाबत प्रश्न विचारण्यात आले. यामध्ये सचिन वाझे प्रकरणावरून राज्य सरकार अडचणीत आले आहे का असेही त्यांना विचारले गेले. यावर शरद पवार यांनी एका पोलिस अधिकाऱ्याच्या प्रकरणाचा राज्य सरकारवर परिणाम होईल असं मला वाटत नाही असं म्हटलं.  सचिन वाझे हे शिवसेनेच्या जवळचे असून त्यावरून विरोधकांनी महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरलं आहे. 

सचिन वाझे प्रकरणाचा तपास सध्या राष्ट्रीय तपास संस्था म्हणजेच एनआयए करत आहे. या प्रकरणाची चौकशी सुरु असून सत्य काय ते समोर येईल. एनआयए तपास करत असेल तर त्यांना सहकार्य करणं ही आमची जबाबदारी आहे. ज्या लोकांनी अधिकाराचा गैरवापर केला त्यांना जागा दाखवण्याचं काम एनआयए करत असल्याचंही शरद पवार यांनी सांगितलं. 

हे वाचा - काँग्रेस नेत्याचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश; शरद पवार यांची पत्रकार परिषद

महाविकास आघाडीमध्ये सर्वकाही सुरळीत
महाविकास आघाडीमध्ये मतभेद असून सरकारच्या कामाबाबत नाराजी आहे का असं विचारलं असता शरद पवार यांनी असं काही नसल्याचं स्पष्ट केलं. उद्धव ठाकरेंना मी कोणतेही आदेश देत नाही असे शरद पवार म्हणाले. मुख्यमंत्री ठाकरेंसोबत झालेल्या चर्चेमध्ये राज्यातील प्रश्नांवर बोलणं झालं. भारत सरकारकडून राज्यसरकारला काही मदत लागणार आहे का? कोणत्या पद्धतीची मदत आणि ती कशी घ्यायची याबाबत चर्चा झाली असं पवारांनी स्पष्ट केलं. 

हे वाचा - शरद पवार राज्य सरकारवर नाराज? दिल्लीत संजय राऊत यांची प्रतिक्रिया

गृहमंत्र्यांचे कौतुक, पदाला धोका नाही
राज्यात मुंबई पोलिस आयुक्त आणि गृहमंत्री बदलाची चर्चा सुरु आहे. याबाबत बोलताना शरद पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कामाचे कौतुक केले. गृहमंत्र्यांनी राज्यातील कायदा सुव्यवस्था राखताना सध्याचा विषय चांगल्या पद्धतीने हाताळला, त्यांच्या पदाला कोणताही धोका नाही असंही शरद पवार यांनी सागंतिले. परमवीर सिंग हे मुंबई पोलिस आयुक्त असून त्यांच्या राजीनाम्याबद्दल मी नाही तर मुख्यमंत्री सांगू शकतील. तसंच कोणाचा राजीनामा घेणं किंवा नियुक्ती करणं हा आमचा विषय नसल्याचेही शरद पवार म्हणाले. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी परिस्थिती चांगल्या पद्धतीने हाताळली आहे. तसंच आम्हीही कठोर पावले उचलू शकतो हेसुद्धा त्यांनी दाखवून दिलं असल्याचं म्हणत पवारांनी गृहमंत्र्यांचे कौतुक केले. 
 

loading image